फोटो सौजन्य: Instagram
देशभरात क्विक कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. अवघ्या काही मिनिटातच आता ग्राहकांना वस्तू डिलिव्हरी केल्या जात आहे. सध्या अनेक क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म उदयास आले आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे झेप्टो.
झेप्टोवर तुम्हाला अनेक प्रकारच्या गोष्टी अवघ्या काही मिनिटात डिलिव्हरी केल्या जातात. त्यामुळेच कमी कालावधीत या अॅपला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. काही महिन्यांपूर्वी कंपनीने Zepto Cafe देखील सुरु केले आहे, जिथे ते फ्रेश पदार्थांची डिलिव्हरी काही मिनिटातच करत आहे.
Yamaha MT-03 vs KTM 390 Duke: इंजिन, फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत कोणत्या बाईकचा पगडा भारी
iPhone 16 लाँच झाल्यानंतर, क्विक-कॉमर्स कंपनी झेप्टोने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर मोबाईल फोनची डिलिव्हरी सुरू केली आहे. आता कंपनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून चक्क कार देखील डिलिव्हर करणार आहे. यासाठी झेप्टोने स्कोडासोबत हातमिळवणी केली आहे. त्याचबरोबर याचा एक व्हिडिओ देखील झेप्टोने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याप्रमाणे झेप्टो १० मिनिटांत घरोघरी इलेक्ट्रॉनिक गोष्टी डिलिव्हर करते, त्याचप्रमाणे ते कार देखील डिलिव्हर करेल.
ज्याप्रमाणे ई-कॉमर्स कंपन्या काही दिवसांत वस्तू पोहोचवतात, त्याचप्रमाणे क्विक-कॉमर्स कंपन्या किराणा मालापासून ते इलेक्ट्रॉनिक्सपर्यंतच्या गोष्टी काही मिनिटांत पोहोचवण्याचे आश्वासन देतात. भारतातील 10 मेट्रो शहरांमध्ये सध्या कार्यरत असलेली झेप्टो ही आघाडीच्या क्विक कॉमर्स कंपन्यांपैकी एक आहे, जी 10 मिनिटांपेक्षा कमी वेळात किराणा सामान, फळे, भाज्या, पर्सनल केअर आयटम, इलेक्ट्रॉनिक्स आणि बरेच काही डिलिव्हर करते.
आता झेप्टोने कारची डिलिव्हरी करण्यासाठी स्कोडा ऑटोसोबत पार्टनरशिप केली आहे. याचा एक व्हिडिओ कंपनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये झेप्टो डिलिव्हरी पार्टनर स्कोडा काइलेक डिलिव्हरी करताना दिसत आहे.
Ola Electric चा मार्केटमध्ये धमाका ! तब्बल 500 KM ची रेंज असणारी इलेक्ट्रिक बाईक केली लाँच
झेप्टो आणि स्कोडा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एका झेप्टो डिलिव्हरी पार्टनरला माहित नाही की त्याला एका कारची डिलिव्हरी करायची आहे. यानंतर तो शोरूममधून Skoda Kylaq डिलिव्हरीसाठी घेतो.
झेप्टो आणि स्कोडा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे की डिलिव्हरी पार्टनर शोरूममधून ताबडतोब कार घेऊन डिलिव्हरीसाठी निघून जातो. कारची सुरक्षित डिलिव्हरी करण्यासाठी Skoda Kylaq फ्लॅटबेड ट्रकला सुरक्षितपणे बांधलेली आहे.
या व्हिडिओतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आता झेप्टो वापरकर्ते स्कोडा कार ऑनलाइन ऑर्डर करू शकतील. याव्यतिरिक्त, झेप्टो स्लाव्हिया सी सेडान आणि कुशाक एसयूव्ही सारख्या इतर स्कोडा कारची देखील डिलिव्हरी देऊ शकते.
जरी झेप्टो त्याच्या 10 मिनिटांच्या डिलिव्हरीसाठी ओळखले जात असले तरी कंपनीला कार डिलिव्हर करण्यासाठी जास्त वेळ लागेल अशी अपेक्षा आहे.