फोटो सौजन्य: Freepik
सध्या भारतात अनेक कार्स लाँच होत आहे. यात इलेक्ट्रिक कार्सचा सुद्धा समावेश आहे. खरंतर ऑटोमोबाईल कंपनीज नेहमीच आपल्या ग्राहकांच्या. आवश्यकतेनुसार कार्स मार्केटमध्ये आणत असतात. ज्याप्रमाणे भारतात एसयूव्हीला मागणी आहे, त्याप्रमाणेच सेडान कार्सला सुद्धा चांगलीच मागणी आहे.
देशभरात दर महिन्याला मोठ्या प्रमाणात वाहनांची विक्री होत असते. यात अनेक कंपनीज कडून सेडान कार ऑफर केली जाते. चला जाणून घेऊया, मागील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या कंपनीची सेडान कार जास्त प्रमाणात विकली गेली आहे.
मारुती, स्कोडा, फोक्सवॅगन, होंडा आणि ह्युंदाई सारख्या कार उत्पादक कंपनीज अनेक सर्वोत्तम सेडान कार ऑफर केल्या जातात. रिपोर्ट्सनुसार, ऑगस्ट 2024 मध्ये देशभरात SUV आणि हॅचबॅक तसेच मध्यम आकाराच्या सेडान कारची मागणी दिसून आली आहे. या सेडान कार सेगमेंटमध्ये गेल्या महिन्यात देशभरात एकूण २४ हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली. तथापि, दरवर्षीच्या आधारावर, या विभागाच्या विक्रीत 26 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या गाड्यांची एकूण विक्री 33 हजारांहून अधिक होती.
ऑगस्ट २०२४ मध्ये Maruti Dzire ला देशात सर्वाधिक मागणी होती. अहवालानुसार, कंपनीने गेल्या महिन्यात एकूण 10,627 युनिट्सची विक्री केली आहे. तर मागील वर्षी याच महिन्यात या कारच्या एकूण 13, 293 युनिट्सची विक्री केली होती.
कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये ऑफर केली जाणारी Hyundai Aura ला भारतीय कार मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. गेल्या महिन्यात या कारच्या एकूण 4304 युनिट्सची विक्री झाली होती, तर मागील वर्षी याच महिन्यात एकूण 4892 युनिट्सची विक्री झाली होती.
Honda ने सेडान कारच्या सेगमेंटमध्ये Amaze देखील ऑफर केली आहे. या कॉम्पॅक्ट सेडानने ऑगस्ट 2024 मध्ये 2585 युनिट्सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये 3564 युनिट्सची विक्री झाली होती.
जरी टॉप-3 मध्ये कॉम्पॅक्ट सेडान कार असल्या, तरी फोक्सवॅगन व्हरटसचा देखील या टॉप-5 कारमध्ये समावेश झाला आहे. व्हर्टसला फॉक्सवॅगनने मध्यम आकाराची सेडान ऑफर केली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये कंपनीच्या या सेडान कारच्या एकूण 1876 युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये या सेडान कारची एकूण विक्री 2140 युनिट्स होती.
Verna देखील Hyundai द्वारे मध्यम आकाराच्या सेडान कार विभागात ऑफर केली आहे. या कारचाही टॉप-5 सेडान कारच्या यादीत समावेश होता. ऑगस्ट 2024 मध्ये 1194 युनिट्सची विक्री झाली, तर गेल्या वर्षी याच कालावधीत 2576 युनिट्सची विक्री झाली होती.