'या' ५ प्रमुख आधारस्तंभांवर डिझाइन करण्यात आली आहे TATA Curvv
टाटा मोटर्सच्या एसयूव्ही श्रेणीमधील टाटा कर्व्ह ही नवीन कार एसयूव्हीची प्रबळता आणि कूपेच्या आकर्षकतेचे अद्वितीय कॉम्बिनेशन आहे. ही कार 2 पेट्रोल इंजिन्स आणि 1 डिझेल इंजिन पर्यायामध्ये आपले उपलब्ध आहे.
ग्राहकांना ४५ केडब्ल्यूएच बॅटरीसाठी १७.४९ लाख रूपये आणि ५५ केडब्ल्यूएच बॅटरीसाठी १९.२५ लाख रूपयांमध्ये ही आकर्षक कार विकत घेता येणार आहे. १२ ऑगस्टपासून या कारसाठी बुकिंग चालू होईल व डिलिव्हरीला २३ ऑगस्टपासून सुरूवात केली जाऊ शकते. ही कार पाच आधारस्तंभांवर डिझाईन केली आहे, ज्यामुळे ग्राहक या कारकडे अधिकच आकर्षित होत आहे. जाणून घेऊया हे पाच आधारस्तंभ नेमके आहे तरी काय?
शेप्ड टू स्टन:
या कारच्या एक्स्टीरिअरमध्ये फ्लश डोअर हँडल्ससह अधिक प्रीमियम दिसणारी कूपे डिझाईन आहे. या डिझाईनला साजेसे तंत्रज्ञान असलेल्या Curvv.ev मध्ये स्मार्ट डिजिटल लायटिंग जसे स्मार्ट डिजिटल कनेक्टेड डीआरएलसह वेलकम अँड गुडबाय ऍनिमेशन, स्मार्ट चार्जिंग, सीक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी फ्रण्ट फॉग लॅम्प्ससह कॉर्नरिंग फंक्शन, स्मार्ट डिजिटल इनेक्टेड एलईडी टेल लॅम्प्स, स्मार्ट डिजिटल स्टीअरिंग व्हील, इलेक्ट्रिक फ्रण्ट चार्जिंग लिडसह ऑटो ओपन/क्लोजिंग, डिजिटल डॅशबोर्ड, फिजिटल कंट्रोल पॅनेल, वॉईस असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफसह मूड लायटिंग आणि स्मार्ट डिजिटल शिफ्टर आहे.
शेप्ड फॉर ग्रॅण्ड्यूर:
Curvv.ev मध्ये सामान्यत: प्रीमियम श्रेणींमध्ये आढळून येणारी टॉप-ऑफ-द-लाइन फीचर्स असणारी कार आहे. ही कारआतील बाजूने बारकाईने डिझाईन करण्यात आली आहे, जेथे आरामदायीपणा व सोयीसुविधेवर अधिक लक्ष देण्यात आले आहे.
अडवान्स्ड कम्फर्ट सीट्स, फ्रण्ट सीट व्हेण्टिलेशन, ६ वे पॉवर ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, ग्रँड सेंटर कन्सोल, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स आणि फ्रण्ट अँड रिअर फास्ट चार्ज सी टाइप ४५ वॅट अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह या एसयूव्ही कूपेमध्ये फ्रण्ट रो आहे.
शेप्ड फॉर परफॉर्मन्स:
प्रगत आर्किटेक्चरवर डिझाईन करण्यात आलेली Curvv.ev 123 केडब्ल्यू / 167 पीएस पॉवर देते, तसेच ८.६ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते. ४५ केडब्ल्यूएच आणि ५५ केडब्ल्यूएच या सर्वात मोठ्या बॅटरी पॅक पर्यायांसह ही कार दैनंदिन प्रवासासाठी, तसेच तुमच्या प्रियजनांसोबत लॉंग ड्राइव्हचा आनंद घेण्यासाठी तुमची सर्वोत्तम सोबती आहे. ही कार फक्त ४० मिनिटांमध्ये १० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते किंवा फक्त १५ मिनिटांमध्ये जवळपास १५० किमी रेंजच्या जलद टॉप-अप्सची खात्री मिळते.
शेप्ड फॉर इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी:
या वेईकलमध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत जसे हार्मनची ३१.२४ सेमी सिनेमॅटिक टचस्क्रिन, २६.०३ सेमी डिजिटल कॉकपीट, Arcade.ev सह सिनेमॅटिक एक्स्पेरिअन्स व २० हून अधिक अॅप, जेबीएल सिनेमॅटिक साऊंड सिस्टम, अडवान्स्ड ओटीए क्षमता, अश्या कित्येक जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहे.
शेप्ड फॉर अॅब्सोल्यूट सेफ्टी:
तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना प्रत्येक प्रवासादरम्यान परिपूर्ण सुरक्षिततेची खात्री देण्यासाठी प्रगत सुरक्षितता वैशिष्ट्यांसह डिझाइन करण्यात आलेल्या Curvv.ev मध्ये ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम्स – लेव्हल २ आहे, ज्यामध्ये २० फीचर्स आहेत. याव्यतिरिक्त, या एसयूव्ही कूपेमध्ये ६ एअरबॅग्ज, ऑल व्हील डिस्क ब्रेक्ससह ब्रेक डिस्क वायपिंग, अकॉस्टिक वेईकल अलर्ट सिस्टम (एव्हीएएस), अश्या सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे.