फोटो सौजन्य: iStock
हल्ली भारतीय कार मार्केटमध्ये अनेक अत्याधुनिक कार्स लाँच होताना दिसत आहे. या कार्समध्ये सध्या एक फिचर कॉमन झाला आहे तो म्हणजे सनरूफ. सध्या अनेक ऑटो कंपनीज आपल्या कार्समध्ये सनरूफ देताना दिसत आहे. अनेकजण या सनरूफ उघडून बाहेरील मोकळ्या हवेचा आनंद घेत असतात.
जर तुमच्या कारमध्ये सुद्धा सनरूफ असेल तर आधी तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. वास्तविक, बहुतेक लोकांना असे वाटते की सनरूफ उघडून आरामशीर कार चालवली जाऊ शकते. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोक अतिवेगाने कार चालवताना सनरूफ तर उघडतातच पण त्यातून बाहेर डोकावायलाही लागतात. यामुळेच तुम्हाला सनरूफ उघडण्याचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत.
फ्रेश हवा: सनरूफ उघडल्याने कारच्या आत अधिक ताजी हवा येते, ज्यामुळे आतील वातावरण ताजेतवाने होते.
नैसर्गिक प्रकाश: यामुळे कारमध्ये नैसर्गिक प्रकाश येतो, ज्यामुळे आतील भाग अधिक हवेशीर आणि चमकदार वाटतो.
हे देखील वाचा: आरामात पास व्हाल Driving License ची टेस्ट, फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
अॅडव्हेंचर्स अनुभव: महामार्गावर किंवा चांगल्या हवामानात सनरूफ उघडल्याने कार चालवणे एका रोमांचक अनुभवात बदलू शकते.
सनरूफ उघडण्याचे तोटे
एयर प्रेशर आणि नॉईस: कार जास्त वेगात असताना सनरूफ उघडल्याने बाहेरील हवेच्या दाब केबिनमध्ये खूप आवाज करू शकतो, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव खराब तर होईल पण तुमचे लक्ष सुद्धा विचलित होईल.
सेफ्टी रिस्क: तुमचे डोके किंवा हात सनरूफमधून बाहेर काढणे खूप धोकादायक असू शकते. अपघात झाल्यास हे जीवघेणे ठरू शकते. ही परिस्थिती विशेषतः मुलांसाठी खूप धोकादायक असू शकते.
धूळ आणि घाण: सनरूफ उघडल्याने केबिनमध्ये बाहेरील धूळ, घाण आणि कचरा येऊ शकतो, ज्यामुळे कार चालवण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात.
फ्युएल एफिशियंसी: जर तुम्ही हायवेवर जास्त वेगाने कार चालवत असाल, तर सनरूफ उघडल्याने हवेचा दाब वाढतो, ज्यामुळे कारच्या एरोडायनामिक्सवर परिणाम होतो. परिणामी कारची फ्युएल एफिशियंसी कमी होऊ शकते.
पाऊस किंवा खराब हवामान: सनरूफ उघडताना अचानक पाऊस झाल्यास किंवा हवामानात बदल झाल्यास कारच्या आत पाणी येऊ शकते, ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि आतील वस्तूंचे नुकसान होऊ शकते.