फोटो सौजन्य: iStock
हल्ली 18 वर्ष लागले की पालक आपल्याला मुलाला ड्रायव्हिंग स्कुलमध्ये टाकतात. जेणेकरून तो किंवा ती लवकर ड्रायव्हिंग लायसन्सची परीक्षा पास होईल व त्यांच्या हातात ड्रायव्हिंग लायसन्स येईल. तसेच कित्येक तरुणांना आपली स्वतःची किंवा वडिलांची बाईक चालवण्याची आस असते परंतु ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे कित्येक जण 18 वर्षाचे झाल्यावर पहिले ड्रायव्हिंग लायसन्स काढतात.
कार किंवा बाईक चालवण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट पास व्हावी लागते हे आपण सर्वेच जाणतो. ही परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे आहे असे तुम्हाला वाटत असेल तर आता तसे नाही. तुमच्या काही चुकांमुळे तुम्ही या परीक्षेत नापास होऊ शकता.
हे देखील वाचा: एक-दोन नव्हे तर ‘या’ 5 एसयूव्ही लाँच करण्याच्या आहे तयारीत Maruti Suzuki
कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी, प्रथम ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग टेस्ट आरटीओकडून घेतली जात असली तरी आता नवीन नियमानुसार तुम्ही पर्सनल ड्रायव्हिंग स्कूलमध्येही ही टेस्ट देऊ शकता. काही जण ही टेस्ट देताना फेल होऊन जातात, ज्याचा परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर होतो. अशावेळी काही महत्वाच्या गोष्टी ध्यान्यात ठेवणे महत्वाचे आहे.
जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टेस्ट देणार असाल तेव्हा आधी RTO चे नियम नीट समजून घ्या. यासोबतच गाडीच्या ब्रेक आणि स्टीयरिंगसारख्या मूलभूत गोष्टी आधीच तपासून घ्या. ड्रायव्हिंग टेस्ट देताना मन शांत करा आणि घाबरू नका. यामुळे तुमच्या अपयशाची शक्यता वाढू शकते. यासोबतच टेस्ट देण्यापूर्वी सराव करणं खूप गरजेचं आहे. ड्रायव्हिंग टेस्ट दरम्यान फक्त तीच कार घ्या ज्यावर हात बसला असेल.
कारला पुढे कसे घेऊन जावे तसेच तिला रिव्हर्स कसे न्यावे याची माहिती प्रत्येक ड्रायव्हरला असणे महत्वाचे आहे. ऑटोमेटेड टेस्टमध्ये, कार एस-आकारात रिव्हर्स घ्यावे लागते, ज्यामध्ये कार चालकाची जबाबदारी असते की कार कुठेही आदळू देऊ नये. ही टेस्ट पूर्ण करण्यासाठीही वेळचे बंधन आहे.
जर तुम्ही नुकतेच कार किंवा बाईक चालवायला शिकला असाल, तर टेकडीवर कार पार्क करणे नवीन ड्रायव्हर्ससाठी कठीण काम असू शकते. यासाठी आधी कमी उतार असलेल्या ठिकाणी कार पार्क करण्याचा सराव करावा. पण एकदा का तुमचा आत्मविश्वास वाढला की, तुम्ही अगदी उंच जागेतही कार पार्क करू शकाल.
जेव्हा तुम्हाला कार रिव्हर्स घ्यावी लागते तेव्हा समांतर पार्किंग सोपे होऊन होते. पण ड्रायव्हिंग टेस्टमध्ये आधी तुम्हाला कार पुढे घेऊन जायला सांगितली जाते, नंतर ती रिव्हर्स घेऊन पार्क करण्यास सांगतात. पण जर तुम्ही सराव केला असेल तर तुम्ही ही परीक्षा सहज पास करू शकता.