Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या कोस्टल रोडवर Lamborghini ने घेतला पेट, 9 कोटी किंमतीच्या कारमध्ये सुद्धा सेफ्टी नाही का?

Lamborghini कार्स या प्रचंड महाग असतात. परंतु एवढी महाग किंमत आणि अत्याधुनिक फीचर्स असून सुद्धा या कारला आग लागली आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 28, 2024 | 03:05 PM
फोटो सौजन्य: X

फोटो सौजन्य: X

Follow Us
Close
Follow Us:

पूर्वी कार विकत घेताना कित्येक ग्राहक फक्त कारच्या मायलेज आणि किंमतीवरच लक्ष द्यायचे. पण आता ही स्थिती बदलत आहे. याचे कारण म्हणजे हल्लीचे ग्राहक आता कारच्या किंमतीबरोबरच सेफ्टी फीचर्सवर सुद्धा लक्ष देत आहे. हीच बाब लक्षात घेता, अनेक कार उत्पादक कंपन्या आपल्या कोर्समध्ये उत्तम सेफ्टी फीचर्स समाविष्ट करत असतात. काही कंपन्या तर आपल्या कार्सच्या सेफ्टी टेस्ट सुद्धा करून घेत असतात.

भारतात काही लक्झरी कार्स उत्पादक कंपन्या देखील आहेत, ज्या उत्तम आणि आलिशान कार्स मार्केटमध्ये ऑफर करत असतात. अनेकांचा असा विश्वास असतो की जेवढी कारची किंमत असेल तेवढेच त्यातील सेफ्टी ही अधिक असते. पण प्रत्येक महागडी कार सुरक्षित असेल असे नाही. नुकतेच मुंबईच्या कोस्टल रोडवर एक अपघात झाला. या रोडवर धावत्या लॅम्बोर्गिनीने पेट घेतल्याची घटना घडली आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Mercedes ची ‘ही’ कार आहे कमाल ! फक्त 30 मिनिटात 10-80% होते चार्ज, ‘या’ दिवशी होणार लाँच

व्होल्वो कारचा अपघात होऊन अवघे काही दिवस उलटले असून आणखी एक कार अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईच्या रस्त्यावर लॅम्बोर्गिनीला आग लागल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण आता या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे की, अत्यंत महागड्या आणि उत्कृष्ट सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज कार्सकडून लोकांनी आपल्या सुरक्षिततेची खात्री बाळगावी की नाही?

लॅम्बोर्गिनीला लागली आग

लॅम्बोर्गिनीच्या आगीची घटना ख्रिसमसच्या रात्री, बुधवार, 25 डिसेंबर रोजी घडली. या घटनेचा व्हिडिओ द रेमंड लिमिटेडचे ​​संस्थापक आणि सीईओ गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ पोस्ट करण्यासोबतच गौतम सिंघानिया यांनी कारच्या सुरक्षेच्या मानकांबाबतही चिंता व्यक्त केली आहे.

Spotted by me: A Lamborghini engulfed in flames on Coastal Road, Mumbai. Incidents like this raise serious concerns about the reliability and safety standards of Lamborghini. For the price and reputation, one expects uncompromising quality—not potential hazards.@MumbaiPolice… pic.twitter.com/lIC7mYtoCB — Gautam Singhania (@SinghaniaGautam) December 25, 2024

गौतम सिंघानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला लॅम्बोर्गिनीमधून धूर निघताना दिसत आहे आणि काही वेळातच कारला आग लागली. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती या कारला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ही लक्झरी कार म्हणजे Lamborghini Revuelto. या कारची एक्स-शोरूम किंमत तब्बल 8.89 कोटी रुपये आहे.

फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि Maruti Alto K10 CNG व्हेरियंट कार तुमची, भरावा लागेल इतका EMI

Volvo दुर्घटना

नुकतेच कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये व्होल्वो कारवर कंटेनर पडून कारमध्ये बसलेल्या सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. ही कार होती Volvo XC90, जी जगातील सर्वात सुरक्षित कार मानली जाते. या वाहनाच्या क्रॅश टेस्टिंग झाली होती. या टेस्टिंग दरम्यान कंपनीने सांगितले होते की वाहनात बसलेल्या कोणालाही व्यक्तीला इजा होणार नाही. मात्र बेंगळुरूमध्ये झालेल्या अपघातात या कारमधील सर्वांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Lamborghini revuelto fire accident in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 03:05 PM

Topics:  

  • Car Accident

संबंधित बातम्या

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या कारचा अपघात, नव्या कोऱ्या मर्सिडीज बेन्झची वाईट अवस्था
1

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या कारचा अपघात, नव्या कोऱ्या मर्सिडीज बेन्झची वाईट अवस्था

वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा कार अपघातात मृत्यू, रुग्णालयात नेणाऱ्या व्हॅन चालकाचा धक्कादायक खुलासा
2

वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा कार अपघातात मृत्यू, रुग्णालयात नेणाऱ्या व्हॅन चालकाचा धक्कादायक खुलासा

शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची जोरात धडक; घाबरली अभिनेत्री, म्हणाली ‘काहीही घडले असते…’
3

शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची जोरात धडक; घाबरली अभिनेत्री, म्हणाली ‘काहीही घडले असते…’

तरुणांच्या स्टंटबाजीत विद्यार्थिनीचा मृत्यू; गावी जाण्यासाठी एसटीची पाहत होती वाट, ‘ती’ कार आली अन्…
4

तरुणांच्या स्टंटबाजीत विद्यार्थिनीचा मृत्यू; गावी जाण्यासाठी एसटीची पाहत होती वाट, ‘ती’ कार आली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.