फोटो सौजन्य: Social Media
आपली स्वतःची कार विकत घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न आता EMI मुळे पूर्ण होत आहे. कित्येक जण आज EMI मुळे फक्त कारच नव्हे अनेक महागड्या गोष्टी सुद्धा घेताना दिसत आहे. देशात अनेक उत्तम कार्स आहेत, ज्या ग्राहकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे मारुती अल्टो के10.
जर तुम्ही मारुती अल्टो K10 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आपण या कारच्या किंमत, फीचर्स तसेच LXI S-CNG आणि VXI S-CNG मॉडेल्सबद्दल जाणून घेऊयात. जर तुम्ही 1 लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटसह या दोघांपैकी एक कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला किती कार लोन घ्यावे लागेल आणि त्यासाठी तुम्हाला किती EMI भरावा लागेल. त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.
BMW नाही तर मनमोहन सिंग यांची पहिली पसंती Maruti च्या ‘या’ कारला होती
LXI S-CNG व्हेरियंट हे CNG चे बेस व्हेरियंट आहे. एक किलो सीएनजीमध्ये ही कार 33 किमीपर्यंतची रेंज देते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5,73,500 रुपये आणि ऑन-रोड किंमत 6,24,438 रुपये आहे.
जर तुम्ही Alto K10 चे हे मॉडेल 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एकूण 5,24,438 रुपये कर्ज घ्यावे लागेल. हे कर्ज तुम्हाला सात वर्षांसाठी 9.8 टक्के व्याजदराने मिळते. अशा परिस्थितीत, तुम्हाला बँक किंवा फायनान्स कंपनीला दरमहा 8,652 रुपयांचा EMI म्हणून भरावे लागतील. त्यानुसार, तुम्हाला या सात वर्षांत व्याज म्हणून 2,02,346 रुपये द्यावे लागतील. यामुळे तुम्हाला मारुती अल्टो K10 LXI S-CNG साठी एकूण 7,26,784 रुपये खर्च करावे लागतील.
नव्या रूपात लाँच झाली देशाची ‘ही’ लोकप्रिय बाईक, देते जबरदस्त मायलेज
VXI S-CNG व्हेरियंट हा CNG मॉडेलचा टॉप व्हेरियंट आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 5,96,000 रुपये आणि ऑन-रोड किंमत 6,48,626 रुपये आहे. जर तुम्ही Alto K10 चा हा व्हेरियंट 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला त्यासाठी एकूण 5,48,626 रुपयांचे लोन घ्यावे लागेल. जर हे लोन 9.8 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी उपलब्ध असेल, तर तुम्हाला दरमहा 9,051 रुपयांचा EMI भरावा लागेल. त्यानुसार, तुम्हाला या सात वर्षांत एकूण 2,11,679 रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. अशाप्रकारे, तुम्हाला मारुती अल्टो K10 VXI S-CNG व्हेरियंटसाठी एकूण 7,60,305 रुपये मोजावे लागेल.