
फोटो सौजन्य: Pinterest
टाटा मोटर्सने सिएरा ही मिड साइझ एसयूव्ही म्हणून लाँच केली आहे. कंपनीने सध्या या एसयूव्हीच्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत जाहीर केली आहे. मात्र, इतर व्हेरिएंटची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही.
Tata Motors कडून नवीन सिएरा लाँच, सुरूवातीची किंमत केवळ 11.49 लाख; ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
कंपनीने लाँचच्या वेळी या एसयूव्हीची बुकिंग तारीख जाहीर केली होती. माहितीनुसार, या एसयूव्हीची बुकिंग अधिकृतपणे 16 डिसेंबर 2025 रोजी सुरू होईल. बुकिंग सुरू झाल्यानंतर ही एसयूव्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन डीलरशिपद्वारे उपलब्ध होईल.
एसयूव्ही बुक झाल्यानंतर, तुम्हाला याच्या डिलिव्हरीची थोडी वाट पहावी लागेल. माहितीनुसार, या कारची डिलिव्हरी 15 जानेवारी 2026 रोजी सुरू होईल, ज्याची संपूर्ण माहिती योग्य वेळी दिली जाईल.
कंपनीकडून या SUV मध्ये अनेक प्रीमियम आणि आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात 19-इंच अलॉयव्हील्स, 17mmची सर्वाधिक स्लिम कनेक्टेड LED हेडलाइट्स, कनेक्टेड LED DRL, LED फॉग लॅम्प, कनेक्टेड LED टेललाइट्स, फ्लश डोर हँडल, कॉर्नरिंग फॉग लॅम्प यांसारखी एक्सटीरियर वैशिष्ट्ये मिळतात.
9 महिन्यांच्या मुलांना गाडीवर बसवताय? मग ‘या’ राज्याने केलेला नियम वाचाच; नाहीतर…
कॅबिनमध्ये ट्रिपल स्क्रीन सेटअप, वायरलेस Android Auto व Apple CarPlay, 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम, HypAR HUD, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, 12 स्पीकरसह Dolby Atmos ऑडिओ सिस्टम, Sonic Shaft साउंड बार, 5G कनेक्टिव्हिटी, सेगमेंटमधील सर्वात मोठे पॅनोरमिक सनरूफ, वेंटिलेटेड व इलेक्ट्रिक फ्रंट सीट्स, रिअर सनशेड, एअर प्युरिफायर, कुल्ड ग्लोव्ह बॉक्स, पावर्ड टेलगेट, टेरेन मोड्स आणि पॅडल शिफ्टर्स अशी फिचर्सची मोठी यादी उपलब्ध आहे.
टाटाने सिएरा ची एक्स-शोरूम सुरुवातीची किंमत 11.49 लाख रुपये ठेवली आहे. ही इंट्रोडक्टरी प्राइस असून, पुढील काळात ती बदलण्याची शक्यता आहे.