फोटो सौजन्य- official Website
भारतीय इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप Raptee.HV ने पहिली हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिक बाइक Raptee.HV T30 लाँच केली आहे. या कंपनीने दावा केला आहे की ही बाईक पूर्ण चार्ज केल्यावर तब्बल 200 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. ही बाईक T30 आणि T30 Sport या दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. बाईकची सुरुवातीची किंमत ही 2.39 लाख रुपये आहे.
Raptee.HV T30 ची डिझाईन ही 250-300cc च्या पारंपारिक पेट्रोल बाईकला आव्हान देण्यासाठी करण्यात आली आहे. Raptee.HV T30 स्पर्धक इलेक्ट्रिक बाइकशी जबरदस्त स्पर्धा केली जाणार आहे. या बाईकची डिलेव्हरी ही जानेवारी 2025 पासून चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर इतर शहरांमध्ये या बाईकच्या विस्ताराची कंपनीची योजना आहे. ग्राहक केवळ 1000 रुपयांची टोकन रक्कम देऊन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून बाइकचे प्री-बुक करू शकतात.
बाईकची बॅटरी आणि श्रेणी
या इलेक्ट्रिक बाइकमध्ये 22 kW ची इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे, जी 70 Nm चा टॉर्क जनरेट करते. बाइक ३.५ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास वेग पकडू शकते. तर बाईकचा टॉप स्पीड हा 135 किमी प्रतितास इतका आहे. बाईकमध्ये तीन रायडिंग मोड आहेत – कम्फर्ट, पॉवर आणि स्प्रिंट. बाईकमध्ये 5.4 kWh बॅटरी पॅक आहे, जो पूर्ण चार्ज केल्यावर 150 किलोमीटरची वास्तविक रेंज आणि 200 किलोमीटरची IDC रेंज देतो.
बाईकचे डिझाइन
Raptee.HV T30 च्या डिझाइनमध्ये डायमंड-आकाराचे हेडलाइट आणि स्प्लिट-सीट सेटअप आहे. यासोबतच, बाईकमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, GPS नेव्हिगेशन आणि ओव्हर-द-एअर (OTA) अपडेटला सपोर्ट करतो. ही बाईक आर्क्टिक व्हाईट, एक्लिप्स ब्लॅक, मर्क्युरी ग्रे आणि होरायझन रेड या चार रंगांच्या पर्यायामध्ये बाजारपेठेत उपलब्ध असणार आहे.
बाईकचे चार्जिंग आणि सस्पेंशन
Raptee.HV T30 उच्च-व्होल्टेज CCS2 चार्जिंग आहे. हे इलेक्ट्रिक कारमध्ये वापरले जाणारे चार्जर आहे. यासह, भारतात उपलब्ध असलेल्या 13 हजाराहून जास्त इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशनवर बाइक सहजपणे चार्ज केली जाऊ शकते. उत्तम राइडिंग अनुभवासाठी, बाईकमध्ये USD फ्रंट फोर्क्स आणि मागील मोनोशॉक सस्पेंशन आहे, जे ॲडजस्टेबल आहे.
Raptee.HV T30 मुळे भारतीय ग्राहकांसाठी भारतीय बाईक विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे केवळ 1000 रुपयांच्या टोकन रक्कमेवर ही बाईक खरेदी करता येऊ शकते.