फोटो सौजन्य: iStock
राज्यात दिवसाला हजारो कारची विक्री होताना दिसते, ज्यात विविध सेगमेंटमधील कारचा समावेश आहे. हल्ली इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. ज्यामुळे अनेक ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाकडे आपले लक्षकेंद्रित करत आहे.
आता महाराष्ट्रात लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंटमधील वाहने खरेदी करणे महागणार आहे. राज्य सरकारनेही याची घोषणा केली आहे. त्यानंतर कोणत्या कंपनीची ईव्ही खरेदी करणे महाग होईल. तसेच त्याची किंमत किती वाढू शकते? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
वाहनचालकांसाठी राज्य सरकारचा दिलासा ! HSRP नंबरप्लेटबाबत घेतला महत्वाचा निर्णय
महाराष्ट्र सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला होता. ज्यामध्ये राज्यात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे महाग होणार असल्याची माहिती देण्यात आली. अर्थसंकल्पानुसार, राज्यातील ईव्ही सेगमेंटमधील वाहनांवर 6 टक्के मोटार व्हेईकल टॅक्स लावण्याचे सांगण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, हे कर फक्त 30 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ईव्हीवरच लावले जातील.
चीनी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी BYD द्वारे BYD Seal ही भारतात इलेक्ट्रिक सेडान म्हणून विकली जाते. याची एक्स-शोरूम किंमत 41 लाख ते 53 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानंतर हे वाहन खरेदी करणे महाग होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात या कारची किंमत सुमारे 3.18 लाख रुपयांनी वाढू शकते. याशिवाय, कंपनीचे Sealion, Atto3 देखील महागणार आहेत.
दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी ह्युंदाई भारतीय बाजारात Hyundai Ioniq5 ही लक्झरी इलेक्ट्रिक कार म्हणून विकते. ही कार 46.05 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर, त्याची खरेदी 3 लाख रुपयांपर्यंत महाग होऊ शकते.
2 लाखात घरी आणा Honda City चा बेस व्हेरियंट ! दरमहा भरावा लागेल फक्त ‘इतकाच’ EMI
किया 30 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीत EV6 देखील देते. या कारची एक्स-शोरूम किंमत 60.96 लाख रुपयांपासून ते 65.96 लाख रुपयांपर्यंत आहे. नवीन मोटार व्हेईकल टॅक्सनंतर, ही कार खरेदी करण्यासाठी 4 लाख रुपये जास्त द्यावे लागू शकतात.
iX1 LWB ही BMW द्वारे विकली जाते. सध्या ही कार 49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येते. परंतु राज्यात कर लागू झाल्यानंतर त्याची किंमत सुमारे 3 लाख रुपयांनी वाढू शकते.
मर्सिडीज 67.20 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत EQA देते. महाराष्ट्रात नवीन कर लागू झाल्यानंतर, ही कार खरेदी करणे 4 लाख रुपयांपर्यंत महाग होऊ शकते.