Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ही कार माझी आई चालवायची…”, Anand Mahindra यांना आठवली एक खास कार, ट्विटरवरील पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल भावुक

ट्विटरवर महिंद्रा ग्रुपचे चेअरमॅन आनंद महिंद्रा हे नेहमीच त्यांचे विचार शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी आपल्या आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 26, 2026 | 06:18 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • आनंद महिंद्रा हे महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन
  • ट्विटरवर आईसाठी खास पोस्ट केली शेअर
  • आनंद महिंद्रा यांना आठवली Fiat कार
आई आणि मुलाचं नातं हे नेहमीच खूप स्पेशल आणि भावनिक असते. आई नेहमीच मुलांना आयुष्याची शिकवण देत असते. नुकतेच महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी आपल्या आईच्या जुन्या कारबाबत ट्विटर एक पोस्ट शेअर केली आहे.

भारतीय ऑटो बाजारात दमदार एसयूव्ही हवी असल्यास अनेक ग्राहक Mahindra कंपनीच्या वाहनांना जास्त प्राधान्य देत असतात. महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा सुद्धा नेहमीच चर्चेत असतात. ते देखील सोशल मीडियावर वारंवार विंटेज कारच्या आठवणींना उजाळा देतात. यावेळी त्यांनी त्यांच्या आईच्या कारबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली.

आनंद महिंद्रा यांनी एक फोटो केला शेअर

अलीकडेच, आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये समोर महिंद्रा BE6 आणि मागे जुनी फियाट प्रीमियर पद्मिनी दिसत आहे. या दोन्ही कार केवळ तांत्रिकदृष्ट्या वेगळ्या नाहीत तर त्या त्यांच्या काळातील सर्वोत्तम कारपैकी एक होत्या.

🙂 And the first car I ever remember riding in was a sky blue Premier Padmini, or a Fiat, as it was called in the 60’s, which my mother owned and used to drive. She received it five years after booking it, because that’s how long the waiting list for a car was in those days!… https://t.co/np0o8sqCLG — anand mahindra (@anandmahindra) January 24, 2026

महिंद्रा यांना आली आईची आठवण

या पोस्टच्या माध्यमातून आनंद महिंद्रा यांनी आपल्या आईची आठवण काढली आहे. त्यांनी लिहिले की, त्यांनी पहिल्यांदा ज्या कारमधून प्रवास केला होता, ती आकाशी निळ्या रंगाची प्रीमियर पद्मिनी होती, जिला 60च्या दशकात फिएट म्हणून ओळखले जायचे. ही कार त्यांच्या आईची होती आणि त्या स्वतः ती चालवत असत. त्या काळात कारसाठी मोठी वेटिंग लिस्ट असायची, त्यामुळे बुकिंग केल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी ही कार मिळाली होती. त्यांनी या कारला “ब्लू बेल” असे नाव दिले होते (कारला नाव देण्याची सवय मला त्यांच्याकडूनच लागली, असेही त्यांनी नमूद केले). त्यामुळे तो मॉडेल आणि ब्रँड त्यांच्या दृष्टीने नेहमीच खास राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकांच्या प्रतिक्रिया

आनंद महिंद्रा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी महिंद्राची पुढील कार “ब्लू बेल” या नावाने येऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे, तर काहींच्या मते ती फिएट कार केवळ वाहन नव्हती, तर एक संपूर्ण युग होती—ज्याच्याशी असंख्य आठवणी जोडलेल्या होत्या.

Web Title: Mahindra group chairman anand mahindra twitter post about mothers fiat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • Anand Mahindra
  • Anand Mahindra Tweet
  • automobile

संबंधित बातम्या

अप टू डेट राहणं कोणी Bajaj कडून शिकावं! खास Electric Scooter झाली अपडेट, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
1

अप टू डेट राहणं कोणी Bajaj कडून शिकावं! खास Electric Scooter झाली अपडेट, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

Volkswagen Polo आता इलेक्ट्रिक अवतारात धावणार! जाणून घ्या रेंज आणि फीचर्स
2

Volkswagen Polo आता इलेक्ट्रिक अवतारात धावणार! जाणून घ्या रेंज आणि फीचर्स

Keeway India ची नवीन क्रुझर बाईक झाली लाँच! एक्स शोरूम किंमत 4.22 लाख रुपये, फीचर्स..
3

Keeway India ची नवीन क्रुझर बाईक झाली लाँच! एक्स शोरूम किंमत 4.22 लाख रुपये, फीचर्स..

स्पोर्टी लूक आणि पॉवरफुल परफॉर्मन्स! भारतात लवकरच एंट्री करणार Honda Prelude… ग्राहकांची उत्सुकता शिगेला
4

स्पोर्टी लूक आणि पॉवरफुल परफॉर्मन्स! भारतात लवकरच एंट्री करणार Honda Prelude… ग्राहकांची उत्सुकता शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.