फोटो सौजन्य: Social Media
भारतीय बाजारात अनेक उत्तम कार्स लाँच होताना दिसत आहे. मागील वर्षात म्हणजेच 2024 मध्ये अनेक ऑटो कंपन्यांनी काही बेस्ट कार्स लाँच केल्या. या कार्स लाँच होताच ग्राहकांनी बुकिंगसाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.
मागील वर्षात दमदार एसयूव्ही सुद्धा लाँच झाल्या. यातीलच एक म्हणजे Electric SUV Mahindra XEV 9e.
सध्या इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीकडे पाहता महिंद्राने आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही मार्केटमध्ये आणली होती. आता कंपनीने याचे टॉप व्हेरियंट Pack Three ला लाँच केले आहे. या व्हेरियंटमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिली आहेत? या एसयूव्हीला किती पॉवरफुल बॅटरी आणि मोटर देण्यात आली आहे. ही एसयूव्ही किती किंमतीला खरेदी करता येईल आणि त्याची बुकिंग आणि डिलिव्हरी कधी सुरू होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
महिंद्राने 26 नोव्हेंबर 2024 रोजी भारतात सादर केलेल्या प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही महिंद्र XEV 9e चा टॉप व्हेरियंट पॅक थ्री लाँच केला आहे. या व्हेरियंट काही खास फीचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय, ही एसयूव्ही विशेष EMI वर देखील ऑफर केले गेले आहे.
महिंद्राने XEV 9e इलेक्ट्रिक SUV च्या पॅक थ्रीमध्ये अनेक फीचर्स दिली आहेत. यात 12.3 इंचाचा ट्रिपल स्क्रीन आहे. याशिवाय, यात AR-HUD, इन्फिनिटी रूफ, अँबियंट लाईट, १६ स्पीकर हरमन कार्डन डॉल्बी अॅटमॉस ऑडिओ सिस्टम, कॅम, कोझी अँड क्लब प्री-सेट थीम्स, एव्हरी डे, रेस अँड बूस्ट ड्रायव्हिंग मोड्स, पाच रडार आणि एक व्हिजन सिस्टम आहे. लेव्हलसह – 2 ADAS, ड्रायव्हर आणि ऑक्युपंट मॉनिटरिंग सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, ऑटोपार्किंग सारख्या फीचर्ससह प्रदान केले आहे.
जितेंद्र EV ने लाँच केली Yunik इलेक्ट्रिक स्कूटर, ११८ km रेंजसह अनेक हटके फीचर्स
कंपनीने या एसयूव्हीमध्ये 79 किलोवॅट क्षमतेची बॅटरी दिली आहे. ज्यामुळे पूर्ण चार्ज केल्यानंतर त्याला 656 किलोमीटरची MIDC रेंज मिळेल. त्यात बसवलेली मोटर त्याला 210 किलोवॅटची शक्ती आणि 380 न्यूटन मीटरचा टॉर्क देईल. या व्हेरियंटला फक्त 6.8 सेकंदात 100 च्या स्पीडने चालवता येते. 175 किलोवॅटच्या फास्ट चार्जरने ही एसयूव्ही 20 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 20 मिनिटे लागतील.
महिंद्रा XEV 9e च्या पॅक थ्री व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 30.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. यासोबतच, ही एसयूव्ही विशेष EMI सोबत देखील आणली आहे. ज्यामध्ये 15.5 टक्के पेमेंट केल्यानंतर, एसयूव्ही सहा वर्षांसाठी 45,450 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येते.
पुण्यात हेल्मेट सक्ती; दुचाकी वाहनांवर डबल सीटसाठी डबल सेफ्टी गरजेची
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या कारची टेस्ट ड्राईव्ह एकूण तीन टप्प्यात सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात, 14 जानेवारी 2025 पासून सहा शहरांमध्ये टेस्ट ड्राइव्ह सुरू होतील. दुसऱ्या टप्प्यात, 24 जानेवारी 2025 पासून 15 शहरांमध्ये चाचणी ड्राइव्ह सुरू होतील आणि तिसऱ्या टप्प्यात, 7 फेब्रुवारी 2025 पासून 45 शहरांमध्ये टेस्ट ड्राईव्ह सुरू होतील. याशिवाय, कारची बुकिंग 14 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि डिलिव्हरी मार्चच्या सुरुवातीला सुरू होईल.