फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्राच्या नाशिक येथे मूळ असलेल्या स्थानिक जितेंद्र EV कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘युनिक’ लाँच केला आहे. हा स्कूटर आधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाईन, आणि चांगल्या कार्यक्षमतेसह खास आजच्या ग्राहकांच्या गरजांसाठी तयार करण्यात आला आहे. जर तुम्ही EV स्कुटर घेण्याचा विचार करत आहात तर नक्कीच युनिक फीचर्ससाठी या युनिक EV स्कुटरचा विचार करणे उत्तम ठरणार आहे. युनिकमध्ये हायपरगियर पावरट्रेन, स्पिन स्विच राइडिंग मोड, चांगला ग्राउंड क्लीअरन्स, आणि आरामदायी सीट दिली आहे. या स्कूटरची किंमत ₹१,२४,०८३ असून १५ जानेवारी २०२५ पासून डिलिव्हरी सुरू होणार आहे.
युनिक स्कूटर पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – मीडो ग्रीन, डस्क ब्लू, फॉरेस्ट व्हाईट, ज्वालामुखी रेड, आणि एक्लिप्स ब्लॅक. यामध्ये क्रोमआर्क एलईडी हेडलॅम्प, रेडिएंट हेक्स टेल लॅम्प, आणि ईगलविजन एलईडी इंडिकेटर आहेत, जे रात्री चांगली दृश्यमानता देतात. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तुमच्या नवीन EV स्कुटरचा रंग निवडता येणार आहे. या पाचही रंगामध्ये गाडी फार आकर्षक दिसत आहे.
स्कूटरच्या वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक, 12-इंच ट्यूबलेस टायर, साइड स्टँड सेन्सर, कीलेस एन्ट्री, यूएसबी चार्जिंग पोर्ट, आणि डिजिटल एलईडी डिस्प्ले यांचा समावेश आहे. 180 मिमी ग्राउंड क्लीअरन्समुळे खडतर रस्त्यांवरही स्कूटर सहज चालवता येते, तर आरामदायी सीटमुळे लांब प्रवास सोपा होतो. तर जर तुम्ही आरामदायी प्रवासासाठी EV स्कुटर घेण्याचा विचार करत आहात तर नक्कीच युनिक स्कुटरने या बाबतीचा फार विचार केलेला दिसून येत आहे.
युनिकमध्ये 3.8 किलावट क्षमतेची डिटॅचेबल बॅटरी आहे, जी पूर्ण चार्ज केल्यानंतर 118 किमीपर्यंत रेंज देते आणि 75 किमी प्रतितास वेगाने जाऊ शकते. याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह JENi अॅप दिले आहे, ज्यातून बॅटरीची माहिती मिळते. कंपनी युनिकसोबत काही खास अॅक्सेसरीज देते, जसे की हेल्मेट लावण्यासाठी युनिकलॅम्प, सामान ठेवण्यासाठी युनिकेज बॅग, आणि पंचर स्कूटर हलवण्यासाठी युनिकार्ट बूस्टर. या अॅक्सेसरीजने मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आकर्षित केले आहे. जितेंद्र ईव्हीचे सह-संस्थापक समकीत शाह यांनी सांगितले की, “युनिक स्कूटर सस्टेनेबल मोबिलिटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. आधुनिक तंत्रज्ञान, चांगल्या डिझाईन आणि चांगल्या कार्यक्षमतेमुळे हा स्कूटर रायडर्सच्या अपेक्षा पूर्ण करेल.” तसेच ग्राहकांनी या EV स्कुटरचा विचार का करावा? याचे उत्तर स्पष्ट करत ग्राहकांना या स्कुटरची खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केले आहे.