Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिंद्रा XUV 3XO ZNG ला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग! पाहा सविस्तरपणे

महिंद्रा XUV 3XO ZNG ला Bharat NCAP कडून 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. 1.2-लिटर टर्बो इंजिन, 24.7 km/kg मायलेज, ड्युअल-सिलिंडर CNG सिस्टीम आणि ₹9.99 लाखांपासून सुरू होणारी किंमत यामुळे ही SUV CNG गाडी घेणाऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 06, 2026 | 06:49 PM
महिंद्रा XUV 3XO ZNG ला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग! पाहा सविस्तरपणे
Follow Us
Follow Us:
  • महिंद्रा XUV 3XO ZNG ने Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये प्रौढ आणि बाल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 5 स्टार रेटिंग मिळवली.
  • 1.2-लिटर टर्बो इंजिन, 24.7 km/kg मायलेज आणि ड्युअल-सिलिंडर CNG सिस्टीम SUV ला खास बनवतात.
  • ₹9.99 लाखांपासून सुरू होणाऱ्या किंमतीत 6 एअरबॅग्स, गॅस लीक डिटेक्शन आणि अनेक सेफ्टी फीचर्स मिळतात.

महिंद्रा XUV 3XO ZNG ने भारतातील Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली आहे. ऑक्टोबर 2026 मध्ये लाँच झालेल्या या फॅक्टरी-फिटेड CNG कॉम्पॅक्ट SUV ने प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 32 पैकी 29.36 गुण, तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 45 मार्क्स मिळवले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, 5 स्टार रेटिंग मिळवणारी ही भारतातील पहिली सब-कॉम्पॅक्ट CNG SUV ठरली आहे. याआधी पेट्रोल XUV 3XO ला 2024 मध्ये याच संस्थेकडून 5 स्टार रेटिंग मिळाली होती.

इंजिन आणि मायलेज

महिंद्रा XUV 3XO ZNG मध्ये 1.2-लिटर, 3-सिलिंडर mStallion टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही मोडमध्ये 110 hp पॉवर आणि 200 Nm टॉर्क देते. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. CNG मोडमध्ये 0 ते 60 kmph वेग गाठण्यासाठी 4.9 सेकंद, तर 0 ते 100 kmph साठी 11.8 सेकंद लागतात, असा कंपनीचा दावा आहे. या SUV चे प्रमाणित मायलेज 24.7 km/kg आहे.

महिंद्रा SUV वर दिवाळी ऑफर्सचा धमाका! Scorpio N वर ₹1.50 लाखांपर्यंत डिस्काउंट, Thar आणि XUV 3XO वरही बचत

बूट स्पेस आणि किंमत

या SUV मध्ये ड्युअल-सिलिंडर CNG सिस्टीम लगेज कंपार्टमेंटखाली बसवली आहे. त्यामुळे सपाट लोडिंग फ्लोअर आणि 270 लिटर बूट स्पेस मिळते. पेट्रोल मॉडेलमध्ये 364 लिटर जागा असल्याने CNG व्हर्जनमध्ये 94 लिटर जागा कमी होते. स्पेअर व्हील गाडीच्या खालच्या बाजूला बसवले आहे.

XUV 3XO ZNG चार व्हेरिएंटमध्ये अव्हेलेबल आहे. MX Edge ची एक्स-शोरूम किंमत ₹9.99 लाख, RevX Edge (O) ₹10.79 लाख, AX5 ₹11.19 लाख आणि RevX A ₹12.27 लाख आहे.

महिंद्रा व्हिजन S चा एक्स्टेरियर आणि इंटेरियर स्पाय फोटो आले समोर! 2027 मध्ये लाँच होण्याची शक्यता

सेफ्टी फीचर्स आणि व्हेरिएंट्स

या SUV मध्ये 35 पेक्षा जास्त स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आहेत. त्यात 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि सर्व प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीट बेल्ट्सचा समावेश आहे. CNG गॅस लीक झाल्यास सिस्टीम आपोआप पेट्रोल मोडवर स्विच होते. CNG कमी झाल्यावरही ऑटो स्विचओव्हर फंक्शन वर्किंग होते.

MX Edge मध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल आणि रिव्हर्सिंग कॅमेरा मिळतो. AX5 मध्ये ड्युअल 10.25-इंच डिस्प्ले, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि कनेक्टेड फीचर्स आहेत. टॉप RevX A मध्ये सनरूफ, Dolby Atmos ऑडिओ आणि ब्लॅक लेदररेट सीट्स मिळतात. टाटा नेक्सॉन CNG आणि मारुती सुझुकी ब्रेझा CNG या तिच्या प्रतिस्पर्धी गाड्या आहेत.

Web Title: Mahindra xuv 3xo zng bharat ncap five star safety rating auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • automobile
  • Mahindra
  • SUV cars

संबंधित बातम्या

रॉयल एनफिल्ड फ्लाइंग फ्ली C6 चे चेन्नईत आगमन! 14 आउटलेट्स, भारतात 40 ठिकाणी नेटवर्क
1

रॉयल एनफिल्ड फ्लाइंग फ्ली C6 चे चेन्नईत आगमन! 14 आउटलेट्स, भारतात 40 ठिकाणी नेटवर्क

मारुती सुझुकी अरेना कार्सवर दिवाळी डिस्काउंटचा धमाका! Victoris वर ₹1.21 लाखांपर्यंत सवलत
2

मारुती सुझुकी अरेना कार्सवर दिवाळी डिस्काउंटचा धमाका! Victoris वर ₹1.21 लाखांपर्यंत सवलत

महिंद्रा SUV वर दिवाळी ऑफर्सचा धमाका! Scorpio N वर ₹1.50 लाखांपर्यंत डिस्काउंट, Thar आणि XUV 3XO वरही बचत
3

महिंद्रा SUV वर दिवाळी ऑफर्सचा धमाका! Scorpio N वर ₹1.50 लाखांपर्यंत डिस्काउंट, Thar आणि XUV 3XO वरही बचत

सुझुकीच्या ऑक्टोबर 2026 विक्रीचा नवा विक्रम! भारतातील विक्रीत 20% वाढ, एक्स्पोर्टमध्ये घट
4

सुझुकीच्या ऑक्टोबर 2026 विक्रीचा नवा विक्रम! भारतातील विक्रीत 20% वाढ, एक्स्पोर्टमध्ये घट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.