फोटो सौजन्य: X
भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये अनेक उत्तम कार ऑफर होत असतात. अनेकांनी तर नवीन वर्षात कार घेण्याचे स्वप्न सुद्धा पहिले असेल. भारतात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत ज्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार चांगल्या कार मार्केटमध्ये लाँच करत आहे. यातीलच एक अग्रगण्य कार उत्पादक कंपनी म्हणजे होंडा.
होंडाने देशभरात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने Honda Amaze चे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये लाँच केले होते. जर तुम्ही सुद्धा ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये Hyundai च्या ‘या’ कार खरेदी केल्यास होणार जबरदस्त बचत
होंडा कार्स इंडियाने 1 फेब्रुवारी 2025 पासून अमेझच्या किंमती वाढवल्या आहेत, कारण आता कारची सुरुवातीची किंमत (जी ३१ जानेवारीपर्यंत वैध होती) आता संपली आहे. नवीन किंमती आता लागू झाल्या आहेत आणि वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये ही वाढ 10000 ते 30000 पर्यंत असणार आहे.
टॉप-एंड ZX MT आणि ZX CVT व्हेरियंटमध्ये जास्तीत जास्त 30,000 रुपयांची वाढ दिसून आली आहे. इतर ट्रिम्सच्या किंमती 10000 ते 15000 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. होंडाने ZX MT व्हेरियंटमधील कलर प्रीमियम काढून टाकला आहे, ज्यामुळे याची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी राहील.
होंडा अमेझमध्ये तेच 1.2-लिटर, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे 90 एचपी पॉवर आणि 110 एनएम टॉर्क निर्माण करते. हे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा CVT पर्यायासह येते. त्याच्या इंधन कार्यक्षमतेबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या मॅन्युअल व्हेरियंटचा मायलेज 18.65 किमी प्रति लिटर आहे, सीव्हीटी ऑटोमॅटिक व्हेरियंटचा मायलेज 19.46 किमी प्रति लिटर आहे. अमेझची सीव्हीटी ऑटोमॅटिक ही या सेगमेंटमधील एकमेव पर्याय आहे, जी ती इतर कॉम्पॅक्ट सेडानपेक्षा वेगळी बनवते.
‘या’ मेड इन इंडिया कारची जपानी लोकांना भुरळ, रेकॉर्डब्रेक मागणीनंतर बुकिंग थांबवली
होंडा अमेझची स्पर्धा थेट मारुती डिझायर, ह्युंदाई ऑरा, टाटा टिगोरशी आहे. परंतु, अमेझ फॅक्टरी-फिटेड सीएनजी पर्यायाशिवाय येते, तर सीएनजी व्हेरियंटची मागणी वेगाने वाढत आहे. उदाहरणार्थ, मारुती डिझायरच्या ५०% पेक्षा जास्त विक्री सीएनजीमधून होते. ह्युंदाई ऑराच्या ८०% पेक्षा जास्त विक्री सीएनजी व्हेरियंटमधून होते.
आता प्रश्न असा निर्माण होतो की किंमत वाढल्यानंतर ग्राहक होंडा अमेझ खरेदी करण्यात रस दाखवतील का? खरेतर होंडाच्या विश्वासावर आणि अमेझच्या उत्कृष्ट कामगिरीवर विश्वास ठेवणारे ग्राहक ती खरेदी करू शकतात. पण याच किमतीत ते अन्य पर्यायांचा सुद्धा विचार करतील.