
Maruti Suzuki eVITARA
स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच
Maruti Suzuki कारच्या या नवीन मॉडेलमध्ये, ग्राहकांना बॅटरी खरेदी करताना त्या बॅटरीची संपूर्ण किंमत मोजावी लागणार नाही. त्याऐवजी त्यांना मूळ किंमत (10.99रुपये) आणि प्रति किलोमीटर बॅटरी वापराचे भाडे 3.99 रुपये द्यावे लागतील. म्हणजे ग्राहक जितकी गाडी चालवतील तितके पैसे द्यावे लागतील. इलेक्ट्रिक वाहनं अधिक परवडावीत आणि सोयीची ठरावीत यासाठी ती अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आली असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
कारच्या अशा डिझाइनमुळे ग्राहकांना e VITARA कमी किंमतीत खरेदी करता येईल. त्याशिवाय सुरुवातीलाच बॅटरीसाठीचा मोठा आगाऊ खर्च टाळता येईल. बॅटरीची देखभाल करण्याबाबत चिंता राहणार नाही. यामुळे या कारबाबत ग्राहक ठोसपणे विचार करु शकतील. विशेषतः हे मॉडेल पहिल्यांदाच इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरु शकतं.
e VITARA ही Maruti ची इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील मोठी सुरुवात असल्याचं मानलं जात आहे. हे SUV मॉडर्न डिजाइन, एडवांस फीचर्स, सिटी-फ्रेंडली ड्राइविंगसारख्या सोयींसह सेवा देऊ शकते.
e VITARA बाहेरुन जुन्या Vitara SUV सारखी दिसत असली तरीही तिला इलेक्ट्रिक टच दिला गेला आहे. पुढे तीन पॉइंट मैट्रिक्स LED DRLs हेडलाइट्ससोबत जोडलेले आहेत. बंपर पियानो काळ्या रंगात फिनिशींग केलेले आहे. मागील भागात स्कल्प्टेड तीन – पॉइंट मॅट्रिक्स LED टेल लॅप्स आणि बोल्ड 3D प्रोफाइल आहेत. त्यामुळे कारचा अंदाज फ्यूचरिस्टिक आणि मॉडर्न दिसतो. पण तरिही मारुती तिच्या जुन्या एसयुवी स्टाइलिंगपासून वेगळी वाटत नाही.
नव्या लुकमध्ये, नव्या ताकदीसह! Royal Enfield ची अपकमिंग बाईक चर्चेत, कधी होणार लाँच?
Ans: e VITARA ची सुरुवातीची किंमत 10.99 लाख रुपये आहे (BaaS मॉडेलवर आधारित).
Ans: या मॉडेलमध्ये बॅटरीची पूर्ण किंमत एकदम न देता, ग्राहकांना प्रति किलोमीटर 3.99 रुपये भाडे द्यावे लागते.
Ans: कमी प्रारंभिक किंमत, बॅटरीसाठी मोठा आगाऊ खर्च नाही आणि देखभालीची चिंता कमी म्हणून पहिल्यांदा EV घेणाऱ्यांसाठी हे मॉडेल सोयीचे ठरते.