Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

5 Seater SUV च्या मागणीत चांगली वाढ! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top-5 वाहनांनी जिंकलाय ग्राहकाचा विश्वास

भारतीय ऑटो मार्केटमध्ये एसयूव्ही वाहनाच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नुकतेच जानेवारी 2026 मध्ये कोणत्या टॉप 5 मिड साइझ एसयूव्हींची विक्री झाली आहे? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 19, 2026 | 05:00 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • जानेवारी 2026 मध्ये 5 सीटर एसयूव्हीला चांगली मागणी
  • कोणत्या SUV ला मिळाली चांगली माहिती
  • जाणून घ्या सेल्स रिपोर्ट
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात. सध्या सर्वाधिक मागणी SUV सेगमेंटमधील वाहनांना मिळताना दिसत आहे. 2025 मध्ये तर ग्राहकांनी सगळ्यात जास्त मागणी एसयूव्ही कार्सलाच दिली होती. नुकतेच जानेवारी 2026 मध्ये कोणत्या 5 सीटर मिड साइझ एसयूव्हीला मागणी मिळाली आहे.

भारतात पाच सीट्ससह अनेक दमदार मिड साईज SUV उपलब्ध आहेत. मागील महिन्यात म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये या सेगमेंटमध्ये कोणत्या पाच SUV ला सर्वाधिक मागणी मिळाली, याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. टॉप 5 मध्ये कोणत्या कार्सचा समावेश झाला आहे, ते जाणून घेऊया.

कशी असू शकते Honda Activa 2026? जाणून घ्या इंजिनपासून ते किमतीपर्यंची A टू Z माहिती

पहिल्या क्रमांकावर Hyundai Creta

ह्युंदाई क्रेटा मिड साईज SUV सेगमेंटमध्ये कायमच लोकप्रिय ठरली आहे. मागील महिन्यात या SUV च्या 17,921 युनिट्सची विक्री झाली. यापूर्वी तिची 18,522 युनिट्स विक्री झाली होती. वर्षानुवर्षांच्या तुलनेत (YoY) विक्रीत सुमारे 3 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.

दुसऱ्या क्रमांकावर – Maruti Victoris

मारुतीने काही महिन्यांपूर्वी बाजारात सादर केलेली विक्टोरिस SUV ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळवत आहे. मागील महिन्यात या मॉडेलच्या 15,240 युनिट्सची विक्री झाली आहे, ज्यामुळे ती दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर Kia Seltos

कियाने नुकतीच सेल्टॉसची नवी जनरेशन बाजारात आणली आहे. जानेवारी महिन्यात या SUV च्या 10,639 युनिट्सची देशभरात विक्री झाली. यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये जुन्या जनरेशनच्या 6,470 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. यामुळे वर्षानुवर्षांच्या तुलनेत 64 टक्क्यांची लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

एकदा चार्ज करा आणि मग कार सुसाट! ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त Electric Car, किंमत…

चौथ्या क्रमांकावर – Toyota Hyryder

टोयोटाची हायरीडरही पाच सीट्ससह मिड साईज SUV सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. मागील महिन्यात या SUV च्या 9,156 युनिट्सची विक्री झाली. जानेवारी 2025 मध्ये ही संख्या 4,941 युनिट्स इतकी होती, म्हणजेच विक्रीत चांगली वाढ झाली आहे.

पाचव्या क्रमांकावर Maruti Grand Vitara

मारुतीची ग्रँड विटारा देखील या सेगमेंटमध्ये मजबूत स्पर्धक ठरली आहे. मागील महिन्यात या SUV च्या 7,030 युनिट्सची विक्री झाली. मात्र जानेवारी 2025 मध्ये तिची 15,784 युनिट्स विक्री झाली होती.

Web Title: Best selling 5 seater suv in january 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV

संबंधित बातम्या

पुणे ऑफरोडरस; फक्त तुमच्यासाठी! ‘या’ आहेत पुण्यातील टॉप ५ ऑफरोडींगचं प्रोफेशनल ट्रेनिंग एजन्सीज!
1

पुणे ऑफरोडरस; फक्त तुमच्यासाठी! ‘या’ आहेत पुण्यातील टॉप ५ ऑफरोडींगचं प्रोफेशनल ट्रेनिंग एजन्सीज!

ऑफरोडींगचं प्रोफेशनल ट्रेनिंग घ्यायचंय? डोंगरदऱ्यात चिखलात ऑफरोडींग करायचंय? या आहेत मुंबईस्थित टॉप ५ ट्रेनिंग एजन्सीज! लगेच पाहा
2

ऑफरोडींगचं प्रोफेशनल ट्रेनिंग घ्यायचंय? डोंगरदऱ्यात चिखलात ऑफरोडींग करायचंय? या आहेत मुंबईस्थित टॉप ५ ट्रेनिंग एजन्सीज! लगेच पाहा

पावसाळ्यात ऑफ-रोडींग साठी पुणे-मुंबई जवळील ही आहेत ५ बेस्ट ठिकाणे! एका क्लिकवर पाहून घ्या
3

पावसाळ्यात ऑफ-रोडींग साठी पुणे-मुंबई जवळील ही आहेत ५ बेस्ट ठिकाणे! एका क्लिकवर पाहून घ्या

पाण्यात गाडी बंद पडल्यास काय करावे? समजून घ्या ‘हायड्रोलिक लॉक’ आणि घ्यावयाची काळजी
4

पाण्यात गाडी बंद पडल्यास काय करावे? समजून घ्या ‘हायड्रोलिक लॉक’ आणि घ्यावयाची काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.