
भारतातील प्रमुख कार प्रोडक्शन कंपनी मारुती सुझुकीच्या लोकप्रिय व्हेन ‘ईको’ ने देशात १५ लाख गाड्यांच्या एकूण विक्रीचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. जानेवारी २०१० मध्ये लाँच झालेल्या आणि ‘ओम्नी’ची जागा घेतलेल्या या व्हेनने अवघ्या १६ वर्षांत ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, शेवटच्या ५ लाख गाड्यांची विक्री अवघ्या साडेतीन वर्षांत झाली असून, हा ईकोच्या इतिहासातील सर्वात जलद विक्रीचा टप्पा ठरला आहे.
विक्रीचा वेग आणि ग्राहकांची पसंती
वेगाने वाढणारी विक्री: पहिल्या ५ लाख गाड्या विकण्यासाठी ईकोला ८ वर्षे (२०१०-२०१८) लागली, पुढील ५ लाख गाड्या ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत विकल्या गेल्या, तर शेवटच्या ५ लाख युनिट्सची विक्री कॉम्पॅक्ट SUV च्या वाढत्या ट्रेंडमध्येही अवघ्या साडेतीन वर्षांत झाली.
ग्रामीण भाग आणि व्यावसायिक पसंती: आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ईकोच्या एकूण विक्रीपैकी ६५% वाटा ग्रामीण भागातून आला आहे. याशिवाय ५५% ग्राहक हे पहिल्यांदाच कार खरेदी करणारे होते, तर ५१% हून अधिक कस्टमर हे ओरीयेनटेड आहेत.
१३ विविध व्हेरियंट्स: ईको ५ आणि ६ सीटर पॅसेंजर व्हेरियंटसह टूर व्ही, रुग्णवाहिका आणि कार्गो अशा १३ प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
इंजिन, मायलेज आणि सुरक्षा फीचर्स
इंजिन पर्याय: यात मारुतीचे १.२ लिटर K-सिरीज ड्युअल जेट ड्युअल VVT पेट्रोल इंजिन मिळते. पेट्रोल व्हर्जन १९.७१ किमी/लिटर तर S-CNG व्हर्जन २६.७८ किमी/किग्रॅ मायलेज देते.
CNG ची वाढती मागणी: ईकोच्या एकूण विक्रीत S-CNG मॉडेलचा वाटा आर्थिक वर्ष २०१९-२० मधील १२ टक्क्यांवरून वाढून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ४८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
अॅडव्हान्स सेफ्टी: २०२६ मॉडेलमध्ये स्टँडर्ड म्हणून ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), ABS, EBD, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, सर्व सीट्ससाठी ३-पॉइंट ELR सीटबेल्ट आणि स्पीड अलर्ट सिस्टीम दिली आहे.
केबिन फीचर्स: डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एअर कंडिशनिंग, लाईट सेव्हिंग डोम लॅम्प आणि रिक्लायनिंग फ्रंट सीट्स यांसारख्या सुविधा केबिनमध्ये मिळतात.
‘ईको स्टार एडिशन‘ लाँच
१५ लाख विक्रीच्या या खास प्रसंगी मारुती सुझुकीने ‘Eeco Star Edition’ देखील सादर केली आहे. या विशेष एडिशनमध्ये १८ एक्सक्लुझिव्ह एक्सटीरियर आणि इंटीरियर अॅक्सेसरीज देण्यात आल्या असून, बॉडी-कलर बंपर्समुळे या व्हेनला अधिक आकर्षक आणि आधुनिक लूक मिळाला आहे.