फोटो सौजन्य- official Website
भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रावर मारुती सुझुकी कारचे अधिराज्य आहे. या कंपनीच्या कार त्यांच्या जबरदस्त मायलेज हाताळणीमुळे देशातील ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. या कार्सची देशातच नव्हे तर परदेशातही लोकप्रियता वाढत आहे. मारुती सुझुकीच्या कारच्या उत्तम मायलेज आणि हाताळणीमागील एक महत्वाचे कारण आहे ते म्हणजे या कारचे प्लॅटफॉर्म. हे प्लॅटफॉर्म फक्त मायलेज वाढवत नाही तर वळणांवर कारला चांगली पकड देते. यामुळेच मारुतीच्या कार या डोंगराळ रस्ते असो की गावामधील कच्चा रस्ता असो त्यावर कोणत्याही अडथळ्याशिवाय चालतात.
मारुती सुझुकी प्लॅटफॉर्म
ज्या प्लॅटफॉर्ममुळे मायलेज वाढते आणि कारवर पकड मिळते तो आहे HEARTECT प्लॅटफॉर्म. मारुती सुझुकीच्या कार या हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित असल्याने उत्तम मायलेज देतात. या प्लॅटफॉर्ममुळे कार हलकी पण मजबूत बनते. कार हलकी बनल्याने वजन कमी होते आणि ज्यामुळे उत्तम मायलेज आणि कारवर चांगली हाताळणी मिळते. तसेच हलक्या वजनामुळे इंजिनवर असलेला ताण कमी होतो. त्याचा परिणाम म्हणजे इंधनाचा वापर कमी होतो आणि ड्रायव्हिंग स्थिरता वाढते. हार्टेक्ट प्लॅटफॉर्मचा वापर करूनच मारुतीकडून कारला असे डिझाइन दिले जाते त्यामुळे रस्त्यांवर कार उत्तम पकड मिळविते आणि त्यामुळे वाहनचालकाची हाताळणी सुधारते.
हार्टेक्ट प्लॅटफॉर्म बद्दल
HEARTECT प्लॅटफॉर्म हा उच्च तंत्र प्लॅटफॉर्म मारुती सुझुकीने त्याच्या कारसाठी खास डिझाइन केला आहे. या प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य म्हणजे हा हलक्या वजनाच्या पण मजबूत संरचनेवर आधारित आहे. ज्याद्वारे कारची सुरक्षितता, स्थिरता आणि इंधन कार्यक्षमतेमध्ये प्रचंड सुधारणा होते.
हलकी आणि मजबूत रचना: हार्टेक्ट प्लॅटफॉर्म हे हलके मात्र अत्यंत मजबूत सामग्रीपासून बनले आहे. यामागे कारचे वजन कमी करणे हा उद्देश आहे, ज्याद्वारे इंजिनवर कमी प्रेशर पडतो आणि कारचे मायलेज सुधारते.
सुरक्षितता: हार्टेक्टमध्ये उच्च-गुणवत्तेचे स्टील वापरले जाते, ज्यामुळे कारची एखादी टक्कर झाल्यास कारचा बचाव करते.
चांगला ड्रायव्हिंग अनुभव: या प्लॅटफॉर्मवर आधारित निर्मिती केलेल्या कार या ड्रायव्हिंग करताना अधिक स्थिर आणि संतुलित असतात. हलके वजन आणि उत्तम डिझाइनमुळे कारची हाताळणी सुधारते. ज्यामुळे चांगला ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.
इंधन कार्यक्षमता वाढ: या प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या कारमध्ये हलक्या वजनाची संरचना असते त्यामुळे मायलेज चांगले होते. कमी वजनामुळे इंजिनला कमी मेहनत करावी लागते, ज्यामुळे इंधनाचा वापर कमी होतो
मारुती सुझुकीच्या बलेनो, स्विफ्ट, डिझायर अशा अनेक कार HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. या मारुतीच्या कारना मोठ्या प्रमाणात ग्राहक पसंती मिळत आहे.