
फोटो सौजन्य: Pinterest
हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती कंपनी मारुती इग्निस ऑफर करते. जर तुम्ही या कारचा टॉप व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुमहाला दरमहा किती ईएमआय भरावा लागेल त्याबद्दल जाणून घेऊयात.
CID फेम Daya ने ‘ही’ प्रीमियम फीचर्स असणारी आलिशान कार, किंमत थेट कोटींच्या घरात
Maruti कडून Ignis ही कार हॅचबॅक सेगमेंटमध्ये ऑफर केली जाते. कंपनीकडून या हॅचबॅकचा बेस व्हेरिएंट 7.09 लाख रुपये एक्स-शोरूम किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जर ही कार खरेदी केली, तर 7.09 लाख रुपये एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त तुम्हाला नोंदणी आणि इंश्युरन्सचा खर्चही करावा लागतो. या कारवर सुमारे 50 हजार रुपये नोंदणी शुल्क आणि जवळपास 39 हजार रुपये विमा भरावा लागतो. यानंतर या कारची ऑन-रोड किंमत अंदाजे 7.98 लाख रुपये इतकी होते.
जर तुम्ही Maruti Ignis चा टॉप व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँक एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज देईल. अशा परिस्थितीत 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 5.98 लाख रुपये बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. बँकेकडून 9 टक्के व्याजदराने आणि 7 वर्षांच्या कालावधीसाठी 5.98 लाख रुपये कर्ज मिळाल्यास, पुढील 7 वर्षांसाठी दरमहा सुमारे 9723 रुपयांचा EMI भरावा लागेल.
फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट Maruti Dzire CNG ची चावी डायरेक्ट तुमच्या खिशात, जाणून घ्या EMI
जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 5.98 लाख रुपये कार लोन घेतले, तर तुम्हाला 7 वर्षे दरमहा 9723 रुपयांचा EMI भरावी लागेल. अशा प्रकारे 7 वर्षांत Maruti Ignis च्या टॉप व्हेरिएंटसाठी सुमारे 2.18 लाख रुपये फक्त व्याज म्हणून द्यावे लागतील. यानंतर एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज यांचा समावेश करून या कारची एकूण किंमत अंदाजे 10.16 लाख रुपये इतकी होईल.
Maruti Suzuki कडून Ignis हॅचबॅक सेगमेंटमध्ये सादर करण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये ही कार थेट Maruti Alto K10, Maruti Celerio, Maruti Wagon R, Tata Tiago आणि Hyundai i10 सोबत स्पर्धा करते.