फोटो सौजन्य- वेबसाईट
सणासुदीच्या काळ हा कंपन्यांसाठी कार विक्रीचा सुगीचा काळ असतो. त्यामुळेच कारनिर्मात्या कंपन्या या काळात नवनवीन कार लॉंच करत आहे. भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने नवीन स्विफ्ट ब्लिट्झ एडिशन लॉंच केले आहे. स्विफ्ट ब्लिट्झ हॅचबॅकच्या थ्री एंट्री-लेव्हल प्रकार LXi, VXi आणि VXi (O) वर आधारित आहे. यामध्येच CNG आणि AMT प्रकारांचाही समावेश आहे. या कारची एक्स शो रुम किंमत ही 6.49 लाख रुपये ते 9.85 लाख रुपये आहे.
ब्लिट्झ एडिशनमध्ये 50 हजार किंमतीच्या पॅकेजमध्ये अधिक ॲक्सेसरीजचा जोडल्या जातात. या ॲडिशन्समुळे एंट्री-लेव्हल व्हेरिएंट व्हॅनिला व्हेरियंटपेक्षा थोडे अधिक प्रीमियम आणि आकर्षक दिसतात. या ॲक्सेसरीजमध्ये रियर अंडरबॉडी स्पॉयलर म्हणजे अपडेट केलेले बंपर, फ्रंट फॉग लॅम्प्स, रिअर अप्पर स्पॉयलर, इल्युमिनेटेड डोअर सिल्स, डोअर व्हिझर्स आणि साइड बॉडी क्लॅडिंग यांचा समावेश आहे.
मारुती सुझुकी स्विफ्ट ब्लिट्झ इंजिन (Maruti Suzuki Swift Blitz)
स्विफ्टच्या ब्लिट्झ एडिशनमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले गेले आहे जे 82 एचपी आणि 112 एनएम पीक टॉर्क देते. कारच्या CNG प्रकारांमध्ये इंजिन हे 70 hp आणि 102 Nm टॉर्क देते. पेट्रोल व्हेरियंट 5-स्पीड मॅन्युअलसह मानक म्हणून उपलब्ध आहेत आणि बेस व्हेरियंट वगळता सर्वांवर 5-स्पीड AMT च्या पर्यायासह उपलब्ध आहेत.
कारच्या विक्री वाढीवर लक्ष केंद्रित करत मारुती सुझुकी कंपनीने यापूर्वीच आपल्या अनेक कारमध्ये विशेष एडिशन लाँच केल्या होत्या. यामध्ये Ignis Radiance Edition, WagonR Waltz Edition, Baleno Regal Edition आणि Grand Vitara Dominion Edition या नव्या एडिशनचा समावेश आहे.
याच काळात इतर अनेक कार उत्पादकांनी या कालावधीमध्ये नवनव्या एडिशन लॉंच केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना अनेक कारच्या पर्याय उपलब्ध झाले आहेत. या पर्यांमध्य़े ह्युंदाई व्हेन्यू ॲडव्हेंचर एडिशन, किआज ग्रॅव्हिटी एडिशन्स,ह्युंदाई क्रेटा नाईट एडिशन, होंडा एलिव्हेट एपेक्स एडिशन, स्कोडा स्लाव्हिया मॉन्टे कार्लो एडिशन, स्कोडा स्लाव्हिया स्पोर्टलाइन एडिशन यासारख्या कॉस्मेटिकली अपडेट केलेल्या स्पेशल एडिशन्स यांचा समावेश आहे.