फोटो सौजन्य- सोशल मीडिया
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनीने दिवाळी अगोदरतच नवीन कार एडिशन लॉंच केली आहे. मारुती सुझुकीने बलेनो (Baleno) कारचे खास ‘रीगल एडिशन’ लॉंच केले आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच ग्रँड विटाराची विशेष डोमिनियन आवृत्ती सादर केली आहे. बलेनोची ही स्पेशल एडिशन सर्व व्हेरियंटमध्ये ऑफर केलेली ऍक्सेसराईज्ड एडिशन आहे. ही आवृत्ती इंटीरियर, एंटिरियर घटकांच्या दृष्टीने अपग्रेड केले गेले आहे आणि पूरक ऍक्सेसरी किटसह येते.
मारुती सुझुकी बलेनो रिगल एडिशनमधील वैशिष्ट्य (Maruti Suzuki Baleno Regal Edition)
मारुतीने बाजार आणलेल्या ‘रिगल एडिशन’ मध्ये इंटीरियर स्टाइलिंग किट, सर्व-हवामानातील केबिन मॅट,बूट मॅट, कुशन, खिडकीचे पडदे, लोगो प्रोजेक्टर लॅम्प आणि अगदी आतील भागात व्हॅक्यूम क्लिनर या वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे.
कारमध्ये 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, वाहनचालकासाठी रंगीत हेड-अप डिस्प्ले, , ऑटो डिमिंग इंटिरियर रिअर व्ह्यू मिरर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल NEXTre’ LED DRLs सह एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि स्मार्टप्ले प्रो+, आणि उत्तम अनुभवासाठी 22.86 सेमी डिस्प्लेसह इन्फोटेनमेंट सिस्टम अशी वैशिष्ट्ये देखील दिली जातात.
बलेनो रिगल (Baleno Regal) बाहेरील बाजू
बलोनोच्या बाहेरील बाजू ही फॅन्सी घटकांसह अपग्रेड करण्यात आले आहे. या अपग्रेडेशनमध्ये क्रोम ग्रिल गार्निश, फ्रंट आणि रिअर अंडरबॉडी स्पॉयलर, साइड क्लॅडिंग, मड फ्लॅप, रिअर आणि टेलगेट गार्निश आणि फॉग लॅम्प गार्निश आहे. यात डोअर व्हिझर, संरक्षक सिल गार्ड आणि बॉडी कव्हर देखील आहे.
कारची सुरक्षा वैशिष्ट्ये
नवीन बलेनो रीगल एडिशनमध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये 6 एअरबॅग्ज, ESP, हिल होल्ड असिस्ट, EBD सह ABS आणि 40 हून अधिक स्मार्ट वैशिष्ट्यांसह पुढील जनरेशमधील सुझुकी कनेक्ट टेलिमॅटिक्स यांचा समावेश आहे.
आम्ही सांगितल्या प्रमाणेच बलेनोची स्पेशल एडिशन मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि सीएनजी व्हर्जनमध्ये सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा या कारच्या चारही प्रकारांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येऊ शकते.
रीगल एडिशनच्या ऍक्सेसरीज किटची व्हेरिएंटनुसार किंमत
या ऍक्सेसरीज कारच्या चारही प्रकारांमध्ये ऑफर केले जातात. त्यांची किंमत ही सिग्मासाठी 60,200 रुपये, डेल्टासाठी 49,990 रुपये, झेटासाठी 50,428 रुपये आणि अल्फासाठी 45,829 रुपये आहे.
या कारमुळे ग्राहकांसाठी अपग्रेडेड एडिशनचा पर्याय मारुती सुझुकीने उपलब्ध करुन दिला आहे.