फोटो सौजन्य- iStock
हॅचबॅक कार प्रकार हा भारतात सर्वाधिक पसंतीचा कार प्रकार आहे परवडणारी क्षमता आणि कॉम्पॅक्टनेस वैशिष्ट्यामुळे हॅचबॅकची मागणी भारतातील खरेदीदारांमध्ये सर्वाधिक आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट ही सप्टेंबर 2024 मध्ये सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक कार ठरली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत मारुती सुझुकीकडून भारतामध्ये सर्वाधिक हॅचबॅक कार विक्री केली जाते. त्यामुळे त्यांच्या अनेक कार या सर्वाधिक विक्री या श्रेणीमध्ये येतात.
मारुती सुझुकीच्या Balano, WagonR, आणि Alto यांनी हॅचबॅक सर्वाधिक विक्री कारच्या यादीमध्ये अनुक्रमे दुसरे, तिसरे आणि चौथे स्थान मिळविले आहे. 5 व्या स्थानावर Hyundai Grand i10 Nios आहे. यामधूनच दिसून येते की, सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पाचपैकी चार कार या मारुती सुझुकीच्या आहेत. त्यामुळे या कंपनीचे वर्चस्व आपल्या कळू शकते.
फोटो सौजन्य- वेबसाईट
स्विफ्टच्या विक्रीत 10 ट्क्क्यांनी वाढ ( Maruti Suzuki Swift)
सप्टेंबर 2024 मध्ये मारुती स्विफ्टच्या तब्बल 16,241 युनिट्सची विक्री झाली. सप्टेंबर 2023 मधील विक्रीत ही 10 टक्के वाढ आहे. मारुतीने सप्टेंबर 2023 मध्ये स्विफ्टच्या 14,703 युनिट्सची विक्री केली.
इतर कारच्या विक्रीबद्दल
त्याचप्रमाणे, विक्रीमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या मारुती सुझुकी बलेनो कारच्या 14,292 युनिट्सची विक्री नोंदवली गेली. मागील वर्षी सप्टेंबर मध्ये मॉडेलच्या 18,417 युनिट्सची विक्री झाल्यामुळे विक्रीमध्ये तब्बल 22 टक्क्यांनी घट झाली आहे. मारुती वॅगनआर ज्याची अतिशय अनोखी रचना आहे त्या कारच्या गेल्या वर्षीच्या विक्रीच्या तुलनेत घट नोंदवली गेली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये कंपनीने 13,339 युनिट्सची विक्री केली होती, तर सप्टेंबर 2023 मध्ये कंपनीने 16,250 युनिट्सची विक्री केली होती.
मारुती अल्टो या कारला तिच्या कॉम्पॅक्ट आकारासाठी ग्राहकांकडून प्राधान्य दिले जाते या कारच्या विक्रीत 11 टक्के वाढ नोंदवली गेली. सप्टेंबर 2024 मध्ये अल्टोच्या 8655 युनिट्सची विक्री झाली होती तर मागील वर्षी या कालावधीमध्ये कारच्या 7791 युनिट्सची विक्री झाली होती.
मारुती सुझुकींच्या कारनंतर विक्रीमध्ये भारतात पाचव्या स्थानी असलेल्या – Hyundai Grand i10 Nios ने वर्ष दर वर्ष या आधारावर 2 टक्के घट नोंदवली. सप्टेंबर 2024 मध्ये 5103 युनिट्सची विक्री झाली आहे, तर सप्टेंबर 2023 मध्ये 5223 युनिटची विक्री झाली होती.
या आकडेवारीतून असे दिसते की, सणासुदीच्या काळात ऑटोमोबाईल क्षेत्रातील हॅचबॅक प्रकारमध्ये नेहमीप्रमाणे मारुतीला ग्राहकांनी पसंती दिली आहे.