फोटो सौजन्य: iStock
पट्रोलच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशावेळी कित्येक जण इलेक्ट्रिक कार्सकडे वळताना दिसतात. पण असेही काही लोकं आहेत जे आपली कार पेट्रोलमधून सीएनजीमध्ये रूपांतर करतात. आपल्या कारमध्ये सीएनजी किट फिट करणे हा अगदी सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे.
गेल्या काही वर्षांत CNG हा स्वस्त इंधनाचा पर्याय म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळेच अनेक ऑटो कंपनीज आपली नवीन कार सीएनजी व्हेरियंटमध्ये सुद्धा उपलब्ध करू देतात. तसेच तुमच्याकडे पेट्रोल कार असेल तर तुम्ही त्यात सीएनजी किट देखील लावू शकता. यामुळे तुमची पेट्रोल कार सीएनजीमध्ये बदलली जाऊ शकते. पण हे असे करताना तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
हे देखील वाचा: मॅन्युअल कारवर ऑटोमॅटिक कार वरचढ, वाढत्या विक्रीमागील नेमके कारण काय?
पहिली स्टेप म्हणजे तुमची कार सीएनजीसाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला तपासावे लागेल. जर तुमची पेट्रोल कार जुनी असेल तर त्यात CNG किट मिळणार नाही. यासाठी तुम्हाला योग्य माहिती मिळवावी लागेल आणि कारमध्ये सीएनजी किट बसवण्याबाबत माहिती घेण्यासाठी एखाद्या मान्यताप्राप्त दुकानदारांशी संपर्क साधावा लागेल.
दुसऱ्या स्टेपबद्दल बोलायचे झाले तर ते कारला सीएनजीमध्ये बदलण्यासाठी सरकारकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अपडेट करावे लागेल कारण फ्युएलचा प्रकार बदलला जाईल.
हे देखील वाचा: हवेत उडण्यास सज्ज राहा, भारतात येत आहे Flying Taxi, जाणून घ्या किती असेल भाडे
तिसऱ्या स्टेपबद्दल बोलायचे झाले तर, कार तपासल्यानंतर आणि परवाना मिळाल्यावर चांगली किट शोधावी लागते. तुम्हाला हे किट अधिकृत डीलरकडूनच खरेदी करावे लागेल. यासोबतच हे सीएनजी किट ओरिजिनल आहे की नाही हे देखील तुम्हाला शोधावे लागेल.
कारमध्ये CNG किट बसवताना तुम्हाला चांगले पैसे मोजावे लागतील. आता पुढच्या स्टेपबद्दल बोलायचे तर सीएनजी किट खरेदी केल्यानंतर, ते स्वतः बदलण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. यासाठी एखाद्या चांगल्या मेकॅनिकची मदत घ्या कारण या प्रक्रियेमध्ये सुरक्षिततेसह कारचे बरेच मेकॅनिकल मोड्यूलेशन समाविष्ट आहे.