Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Fronx Vs Nissan Magnite: इंजिन, मायलेज, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती SUV ठरते बेस्ट?

भारतीय ऑटो बाजारात कॉम्पॅक्ट एसयूव्हीला चांगली मागणी मिळताना दिसते. याच सेगमेंटमध्ये Maruti Fronx आणि Nissan Magnite ला चांगली मिळतेय, मात्र, दोघांपैकी बेस्ट SUV कोणती?

  • By मयुर नवले
Updated On: Feb 23, 2026 | 04:04 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • देशात SUV वाहनांना सर्वाधिक मागणी
  • Maruti Fronx आणि Nissan Magnite या दोन्ही उत्तम पर्याय
  • जाणून घ्या दोन्ही कार्सची माहिती
भारतीय ऑटो बाजारात SUV वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसते. ग्राहकांची हीच वाढीव मागणी लक्षात घेत अनेक कार उत्पादक कंपन्यांनी मार्केटमध्ये एकापेक्षा एक अशा उत्तम एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. अशाच दोन कार म्हणजे Maruti Fronx आणि Nissan Magnite.

भारतामध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटला सर्वाधिक मागणी आहे. या सेगमेंटमध्ये जवळपास सर्वच वाहन उत्पादक आपली मॉडेल्स सादर करतात. या श्रेणीत Maruti Fronx आणि Nissan Magnite यांच्यात थेट स्पर्धा पाहायला मिळते. इंजिन, फीचर्स, मायलेज आणि किंमत या बाबतीत कोणती एसयूव्ही अधिक फायदेशीर ठरू शकते, याची माहिती आपण पाहूया.

पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब

फीचर्स तुलना

मारुती सुझुकीकडून ऑफर केली जाणारी फ्रॉन्क्स अनेक आधुनिक फीचर्ससह येते. यात एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, ऑटो हेडलॅम्प, एलईडी कनेक्टेड टेललाइट, रियर वायपर आणि वॉशर, स्पॉयलर, स्किड प्लेट, शार्क फिन अँटेना, ड्युअल टोन एक्स्टेरियर, फॅब्रिक सीट्स, टिल्ट व टेलिस्कोपिक स्टेअरिंग व्हील, हाइट ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रियर एसी व्हेंट, फुटवेल इल्यूमिनेशन, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल ओआरव्हीएम, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, की-लेस एंट्री, स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स, 22.86 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, आर्कामिस साउंड सिस्टम, ॲपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, चार स्पीकर्स, दोन ट्वीटर, हेड-अप डिस्प्ले आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखे फीचर्स दिले आहेत.

दुसरीकडे, निसान मॅग्नाइटमध्ये की-लेस एंट्री, एलईडी टेल लॅम्प, 16 इंच अलॉय व्हील्स, रूफ रेल्स, एलईडी टर्न इंडिकेटर, 17.78 सेमी टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, अँबिएंट लाइटिंग, ॲपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, पीएम 2.5 एअर फिल्टर, आठ इंच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ऑटो डिमिंग आयआरव्हीएम असे फीचर्स दिले आहेत.

इंजिन आणि मायलेज

फ्रॉन्क्समध्ये 1.2 लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल, 1.2 लिटर सीएनजी आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. 1.2 लिटर पेट्रोल इंजिन 66 किलोवॅट पॉवर आणि 113 न्यूटन मीटर टॉर्क देते, तर टर्बो इंजिन 73.6 किलोवॅट पॉवर आणि 147.6 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. या एसयूव्हीला 20.02 ते 22.89 किमी प्रतिलिटर इतके मायलेज मिळते. मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशनचे पर्यायही उपलब्ध आहेत.

मॅग्नाइटमध्ये 1.0 लिटर नॅचरल एस्पिरेटेड आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. यातून अनुक्रमे 72 पीएस आणि 100 पीएस पॉवर तसेच 96 आणि 160 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल, 5-स्पीड एएमटी आणि सीव्हीटी ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.

किंमत

फ्रॉन्क्सची एक्स-शोरूम किंमत 6.85 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी 11.98 लाख रुपये आहे. तर मॅग्नाइटची एक्स-शोरूम किंमत 5.62 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी 10.96 लाख रुपये आहे.

कोणती कार खरेदी करावी?

जर तुम्हाला अधिक प्रीमियम फीचर्स, उत्तम मायलेज आणि मारुतीची विश्वासार्ह सर्व्हिस नेटवर्क हवे असेल, तर फ्रॉन्क्स योग्य पर्याय ठरू शकते. मात्र कमी बजेटमध्ये अधिक पॉवर आणि विविध ट्रान्समिशन पर्याय हवे असतील, तर मॅग्नाइटही चांगला पर्याय ठरतो.

Web Title: Maruti fronx vs nissan magnite which compact suv is perfect car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV

संबंधित बातम्या

पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब
1

पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब

किंमत कमी म्हणूनच मार्केटमध्ये भाव जास्त! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु
2

किंमत कमी म्हणूनच मार्केटमध्ये भाव जास्त! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु

Hardik Pandya ने EX Wife नताशा आणि मुलगा अगस्त्यला भेट दिली ‘ही’ खास आलिशान कार, किंमत वाचूनच हडबडून जाल
3

Hardik Pandya ने EX Wife नताशा आणि मुलगा अगस्त्यला भेट दिली ‘ही’ खास आलिशान कार, किंमत वाचूनच हडबडून जाल

‘या’ कंपनीचा मोठा निर्णय, 2.80 कोटींची किंमत असणाऱ्या ‘या’ Luxury Car ला बोलावले परत
4

‘या’ कंपनीचा मोठा निर्णय, 2.80 कोटींची किंमत असणाऱ्या ‘या’ Luxury Car ला बोलावले परत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.