Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मारुती सुझुकीच्या सर्वात स्वस्त कारमध्येही होणार अधिक सुरक्षित प्रवास! कंपनीने कारमध्ये दिला ‘हा’ फिचर

मारुती सुझुकी कंपनीकडून  केवळ आपल्या प्रीमियम कार्सवरच नव्हे तर आपल्या बजेट कारच्या सुरक्षेकडेही लक्ष दिले जात आहे. आपल्या परवडणाऱ्या कारच्या सुरक्षेसाठी महत्वाचे पाऊल टाकत कंपनीने Alto आणि S-Presso मध्ये एक मोठा फिचर दिला आहे. जाणून घेऊया त्याबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Aug 24, 2024 | 05:50 AM
फोटो सौजन्य- X

फोटो सौजन्य- X

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या काळात कोणत्याही वाहनातील सुरक्षा घटक हे सर्वात महत्वाचे घटक आहेत. ग्राहक वाहन खरेदी करताना कारची किंमत, वैशिष्ट्ये, इंजिन क्षमतेसह सुरक्षेसंबंधी बांबींनाही महत्व देत आहेत. त्यामुळे कार उत्पादकांनाही सुरक्षा घटकांवर कार्य करावे लागत आहे. कार कोणत्याही प्रकारातील असूदे त्यातील सुरक्षा घटक हे त्या कारमध्ये आकर्षकता प्रदान करत नसले तरी प्रवास करताना आपण या कारमध्ये सुरक्षित आहोत ही भावना वाहनचालक आणि प्रवास करणाऱ्यांमध्ये निर्माण करते. त्यामुळे प्रवासाचा आनंदही घेता यतो.

मारुती सुझुकीचा सुरक्षिततेसंबंधी वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी ही भारतामध्ये सर्वात जास्त कार विक्री करणाऱ्या कंपनीकडून  केवळ आपल्या प्रीमियम कार्सवरच नव्हे तर आपल्या बजेट कारच्या सुरक्षेकडेही लक्ष दिले जात आहे. आपल्या परवडणाऱ्या कारच्या सुरक्षेसाठी महत्वाचे पाऊल टाकत कंपनीने Alto आणि S-Presso मध्ये एक मोठा बदल केला आहे. कंपनीने आता या दोन्ही कारमध्ये स्टॅडंर्ड म्हणून इलेक्ट्राॅनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP) समाविष्ट केला आहे. आता हे सुरक्षा वैशिष्ट्य या दोन्ही कारच्या सर्व बेस टू टॉप मॉडेल्समध्ये उपलब्ध असेल.  विशेष म्हणजे या नवीन फीचरनंतरही कंपनीने किमती वाढवलेल्या नाहीत.

हे देखील वाचा-हिरोकडून 2024 Hero Glamour बाईक लॉंच! 125 cc रेंजमध्ये होणार कडवी टक्कर, जाणून घ्या नव्या बाईकबद्दल

ईएसपी म्हणजे काय?

इलेक्ट्राॅनिक स्टेबिलिटी प्रोग्राममुळे वाहनाची स्थिरता सुधारण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होतो. आव्हानात्मक आणि  निसरड्या रस्त्याच्या परिस्थितीत वाहन घसरण्यापासून रोखण्यासाठी ESP अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS) यांच्या संयोगाने कार्य करते.

कारमध्ये आधीपासून उपलब्ध असलेली सुरक्षा वैशिष्ट्ये

Alto K10  आणि S-Presso  या मारुती सुझुकीच्या हार्टटेक्ट (HEARTECT)  प्लॅटफॉर्मवर आधारित एंट्री-लेव्हल किफायतशीर छोट्या कार आहेत. ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, EBD सह ABS, कोलॅप्सिबल स्टीयरिंग कॉलम आणि इंजिन इमोबिलायझर यांसारखी काही सुरक्षा वैशिष्ट्ये या वाहनांमध्ये उपलब्ध आहेत.

हे देखील वाचा-महिना 25 हजार कमावणाऱ्या ‘या’ ट्रक चालकाने अडीच वर्षात बांधले 1 कोटींचे घर, जाणून घ्या हे कसे शक्य झाले?

Alto K10  आणि S-Presso या कारच्या अगोदरच्या मॉडेल्सना GNCAP क्रॅश सुरक्षा चाचण्यांमध्ये अतिशय कमी गुण मिळाले आहेत. आता मात्र कंपनीने जोडलेल्या फिचरमुळे वाहन सुरक्षेसंबंधी अधिक चांगले झाले आहे.  या अधिक सुरक्षा उपकरणे, मजबुतीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाची भर घातल्याने कारचा सुरक्षाविषयक दर्जा नक्कीच सुधारणार आहे आणि त्याच्या सर्वाधिक उपयोग  ग्राहकांना होणार आहे.

Web Title: Maruti suzukis cheapest car will make for a safer journey the company has given this feature in the car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2024 | 05:50 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.