फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. याच स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी अनेक जण आपले बजेट आखत असतात, तसेच दिवसरात्र कष्ट करतात. कित्येक जण तर योग्य डिस्काउंटच्या प्रतीक्षेत असतात. अशातच ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. कारण एमजी मोटर इंडिया या महिन्यात त्यांच्या फ्लॅगशिप एसयूव्ही एमजी ग्लोस्टरवर एकूण 4 लाख रुपयांपर्यंतचा फायदा देत आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेउयात.
एमजी कॉमेट ईव्ही ही देशातील सर्वात कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कारपैकी एक मानली जाते. कंपनीने या मॉडेलवर तब्बल 56,000 पर्यंतची सवलत जाहीर केली आहे. कॉमेट ईव्हीची सुरुवातीची किंमत ₹4.99 लाख (एक्स-शोरूम) आहे. यात एमजीने काही मॉडेल्ससाठी आणलेला नवीन बॅटरी ऍज अ सर्विस (BaaS) पर्यायही उपलब्ध आहे. यामध्ये ग्राहकांना बॅटरी वेगळी भाड्याने घेण्याची सुविधा दिली जाते, ज्यासाठी ₹3.1 प्रति किलोमीटर वापरावर शुल्क आकारले जाते.
ग्राहकांचा ‘या’ कारला न भूतो न भविष्यति असा प्रतिसाद, कंपनीला 3 पटीने वाढवावे लागले उत्पादन
फीचर्सबाबत बोलायचे झाले तर कॉमेट ईव्हीमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, एबीएस + ईबीडी, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल-होल्ड असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांसारख्या आधुनिक सुरक्षा सुविधा देण्यात आल्या आहेत.
गणेश चतुर्थी ऑफरअंतर्गत, एमजी झेडएस ईव्हीवर ₹1.34 लाखांपर्यंत सूट देत आहे. झेडएस ईव्ही कॉमेट ईव्ही सारख्याच बाएस मॉडेलसह देखील उपलब्ध आहे. या मॉडेलअंतर्गत, ग्राहक फक्त 13 लाखांना (एक्स-शोरूम) कार खरेदी करू शकतात आणि बॅटरीसाठी प्रति किलोमीटर ₹4.5 देऊ शकतात. यात 75 हून अधिक कनेक्टेड फीचर्स, 7-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.1 -इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 100 हून अधिक व्हॉइस रेकग्निशन कमांड आहेत.
या ICE-पॉवर्ड कारबद्दल बोलायचे झाले तर, एमजी त्यांच्या झेडएस ईव्ही, एमजी अॅस्टरच्या आयसीई पॉवरवर ₹1.10 लाखांपर्यंत सूट देत आहे. ऑटोमेकरने अलीकडेच एमजी अॅस्टरची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाखांपर्यंत कमी केली आहे. या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, ABS, ESP, TPMS, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, 4-डिस्क ब्रेक, 360 डिग्री कॅमेरा आणि ADAS आहेत.
केंद्र सरकार GST कमी करणार? टॅक्स कमी झालाच तर किती असेल Tata Nexon ची किंमत?
MG Hector आणि Astor च्या Sharp Pro MT व्हेरिएंटची किंमत 19.59 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत वाढली आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, कंपनी MG Hector वर 1.15 लाख पर्यंत कॅश डिस्काउंट देत आहे. यात पॅनोरॅमिक सनरूफ, 10.4 -इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि ADAS (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टम्स) आहेत.