
फोटो सौजन्य: @HyundaiIndia/ X.com
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम कंपन्या आहेत, ज्या विविध सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर करतात. यातही सर्वाधिक डिमांड ही एसयूव्ही विभागातील वाहनांना असते. हीच मागणी लक्षात घेत, अनेक वाहन उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये दमदार एसयूव्ही ऑफर करत असतात. नुकतेच Hyundai ने त्यांच्या लोकप्रिय ह्युंदाई व्हेन्यूचे नवीन व्हर्जन मार्केटमध्ये लाँच केले आहे. यात अनेक दमदार फीचर्स, नवीन स्टायलिंग आणि प्रीमियम इंटिरिअरसह अपडेट केले गेले आहे. तसेच ही कार दोन पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. चला जाणून घेऊयात, ही कार एका लिटरमध्ये किती मायलेज देते.
Maruti Nexa देतेय भरभरून डिस्काउंट, ‘या’ Cars होणार तगडी बचत
नवीन व्हेन्यूमध्ये दोन पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल इंजिन देण्यात येत आहे. त्याचे 1.2-लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन 83 पीएस पॉवर आणि 114 एनएम टॉर्क निर्माण करते. 1-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन 120 पीएस पॉवर आणि 172 एनएम टॉर्क निर्माण करते. 1.5 लीटर डिझेल इंजिन देखील उपलब्ध आहे, जे 116 पीएस पॉवर आणि 250 एनएम टॉर्क निर्माण करते.
नवीन व्हेन्यूमध्ये दोन पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल इंजिन देण्यात येत आहे. त्याचे 1.2-लिटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन 83 पीएस पॉवर आणि 114 एनएम टॉर्क निर्माण करते. 1-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन 120 पीएस पॉवर आणि 172 एनएम टॉर्क निर्माण करते. 1.5L डिझेल इंजिन देखील उपलब्ध आहे, जे 116 पीएस पॉवर आणि 250 एनएम टॉर्क निर्माण करते.
Hyundai Venue च्या पेट्रोल इंजिनचे 6 व्हेरिएंट्स बाजारात उपलब्ध आहेत. पेट्रोल व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत बेस HX 2 व्हेरिएंट (1.2-लीटर NA इंजिन) साठी 7.89 लाख रुपये पासून सुरू होते आणि टॉप-एंड HX 10 व्हेरिएंट (1-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन व DCT ट्रान्समिशन) साठी 14.56 लाख रुपये एक्स-शोरूमपर्यंत जाते.
देशातील 5 सर्वात स्वस्त बाईक कोणत्या? किंमत 55 हजारांपासून सुरु
भारतीय बाजारात नवीन Hyundai Venue ची स्पर्धा थेट Tata Nexon, Maruti Brezza, Kia Sonet, Mahindra XUV 3XO, Kia Syros आणि Skoda Kylaq या मॉडेल्सशी होणार आहे.