फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम कंपन्या दमदार कार ऑफर करत असतात. मात्र, ग्राहकांना कार खरेदी करण्यास प्रवृत्त करण्यासाठी दमदार डिस्काउंट सुद्धा देणे गरजेचे आहे. सध्या देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki त्यांच्या काही कार्सवर दमदार डिस्काउंट ऑफर करत आहे. कंपनी Nexa डिलरशिपच्या अंतर्गत अनेक कार्सची विक्री करत असते. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने या महिन्यात नेक्सा डीलरशिपवर ऑफर केलेल्या सर्व कारवर लाखो रुपयांचे डिस्काउंट देत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
नेक्सा डीलरशिपवर उपलब्ध असलेल्या मारुतीच्या सर्वात स्वस्त कार इग्निसवर या महिन्यात 57 हजार रुपयांची सूट मिळत आहे. टॉप-स्पेक व्हेरिएंटच्या किमती 5.35 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होतात आणि 7.42 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत जातात.
CNG भरताना आपल्याला ड्रायव्हर कारमधून का उतरवतो? फक्त सेफ्टी नव्हे तर ‘ही’ देखील आहेत कारणं
मारुती प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये बलेनो कार ऑफर करते. या महिन्यात या कारवर 47000 रुपयांची ऑफर देण्यात येत आहे. कंपनीने कारची किंमत 5.99 लाख ते 9.10 लाख (एक्स-शोरूम) रुपयांदरम्यान ठेवली आहे.
मारुती नेक्सा द्वारे कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये फ्रॉन्क्स देखील विकते. ही एसयूव्ही या महिन्यात 78000 रुपयांचे डिस्काउंट देत आहे. कंपनी ही कार 6.85 लाख (एक्स-शोरूम) रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत देते. त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 11.98 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे.
मारुती भारतीय बाजारात ऑफ-रोड एसयूव्ही म्हणून जिमनी देखील देते. ही एसयूव्ही या महिन्यात 75000 रुपयांच्या बचतीसह खरेदी करता येईल. याची एक्स-शोरूम किंमत 12.32 लाख ते 14.45 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.
Honda City ला फुटलाय घाम! ‘या’ कारच्या विक्रीत भरमसाट वाढ, ग्राहक तर अक्षरशः तुटून पडलेत
मारुति कंपनीकडून XL6 ही MPV देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. या महिन्यात ही MPV खरेदी केल्यास तुम्हाला जास्तीत जास्त 45 हजार रुपयांपर्यंतची बचत करता येईल. एक्स-शोरूम किंमत (सुरुवात) 11.52 लाख रुपये आहे. तर याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 14.48 लाख रुपये आहे.
Honda City ला फुटलाय घाम! ‘या’ कारच्या विक्रीत भरमसाट वाढ, ग्राहक तर अक्षरशः तुटून पडलेत
मारुति ग्रँड विटारा नेक्सा (Nexa) च्या माध्यमातून ऑफर केली जाते. या महिन्यात ही SUV खरेदी केल्यास तुम्हाला 2.1 लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. या कारची सुरवातीची (एक्स-शोरूम) किंमत 10.77 लाख रुपये आहे. तर याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत (एक्स-शोरूम) 19.72 लाख रुपये आहे.
मारुति कंपनी Invicto ही लक्झरी MPV म्हणून ऑफर करते. या महिन्यात ही MPV खरेदी केल्यास तुम्हाला जास्तीत जास्त 1.4 लाख रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. या कारची सुरवातीची (एक्स-शोरूम) किंमत 24.97 लाख रुपये आहे. तर याच्या टॉप व्हेरिएंटची (एक्स-शोरूम) किंमत 28.61 लाख रुपये आहे.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यात Maruti Grand Vitara (मारुति ग्रँड विटारा) या SUV वर सर्वाधिक, म्हणजेच 2.1 लाख रुपयांपर्यंतची बचत करता येऊ शकते. त्यानंतर Maruti Invicto (मारुति इनविक्टो) या MPV वर 1.4 लाख रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी आहे.
Ans: मारुति इग्निस (Ignis) या कारवर या महिन्यात 57 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. मारुति बलेनो (Baleno) या प्रीमियम हॅचबॅक कारवर 47,000 रुपयांपर्यंतची ऑफर देण्यात येत आहे.
Ans: मारुति फ्रॉन्क्स (Fronx) या कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर या महिन्यात 78,000 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट उपलब्ध आहे. मारुति जिमनी (Jimny) या ऑफ-रोड एसयूव्हीवर या महिन्यात 75,000 रुपयांपर्यंतची बचत करता येईल.






