फोटो सौजन्य- X
भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद सिराज याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. चर्चेचे कारण ठरतेय त्याने विकत घेतलेली कार. मोहम्मद सिराज याने रेंज रोवर ही आलिशान कार खरेदी केली आहे. सेंटोरिनी ब्लॅक रंगाची रेंज रोव्हर मोहम्मद सिराज याने खरेदी केली आहे. या नव्या कारचा कुटुंबासोबतचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यासाठी चाहते त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे.
सिराजची सोशल मीडियावरील पोस्ट
तुमच्या स्वप्नांवर मर्यादा नाही, कारण ते तुम्हाला अधिक परिश्रम करण्यास आणि अधिक प्रयत्न करण्यास प्रवृत्त करतात.
तुम्ही सातत्याने केलेले प्रयत्न तुम्हाला पुढे घेऊन जाणार. मला माझ्या कुटुंबासाठी @landroverpridemotors कडून ही ड्रीम कार खरेदी करण्यासाठी सर्वशक्तिमान देवाच्या आशीर्वादाबद्दल आणि मला सक्षम बनवल्याबद्दल कृतज्ञ आहे.
जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही साध्य करू शकता.
Have NO LIMITS on your DREAMS, as they push you to work harder and strive for more.
It’s the effort you put in with consistency that will take you forward. Grateful to the Almighty for his blessings and for making me capable of buying this dream car for my family. pic.twitter.com/iQzTD4btrA
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) August 11, 2024
सिराजच्या कारची किंमत
सिराजने खरेदी केलेल्या रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी LWB ची भारतीय मार्केटमध्ये किंमत 2.39 कोटी रुपये (एक्स-शोरूम ) आहे. कारचे वैशिष्ट म्हणजे ही कार कस्टमाइज केली जाऊ शकते, कस्टमाइज कार केल्यास या लक्झरी कारच्या किंमतीत बदल होतो. ही कार 3.0-लिटर डिझेल इंजिन आणि 3.0-लिटर पेट्रोल इंजिन या दोन्ही प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. यामुळे, इंजिनसह स्वयंचलित ट्रांसमिशन संलग्न आहे.
रेंज रोव्हरची वैशिष्ट्ये
लँड रोव्हर या कंपनीची रेंज रोव्हर ही उच्च किंमत श्रेणीतील कार आहे. ही कार ऑल-व्हील ड्राइव्हसाठी ओळखली जाते. रेंज रोव्हर कार अनेक ड्रायव्हिंग मोडमध्ये चालवता येते. हे वाहन रियर व्ह्यू मिरर, घरगुती प्लग सॉकेट आणि पॉवर्ड जेश्चर टेलगेटसह सुसज्ज आहे. या रेंज रोव्हर एसयूव्हीमध्ये 13.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यासोबतच या वाहनात 4-झोन क्लायमेट कंट्रोलची सुविधाही देण्यात आली आहे. या कारचे दरवाजे अगदी सहजतेने आणि कोणत्याही आवाजाशिवाय बंद होतात. या कारमध्ये चावीशिवाय प्रवेश करता येतो.
सिराजने खरेदी केलेल्या रेंज रोव्हरची डिझेल पॉवरट्रेन 346 bhp ची शक्ती प्रदान करते आणि 700 Nm टॉर्क जनरेट करते. पेट्रोल पॉवरट्रेनसह, ही कार 393 bhp पॉवर मिळवते आणि 550 Nm टॉर्क जनरेट करते. डिझेल पॉवरट्रेनसह, या कारला 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी केवळ 6.3 सेकंद लागतात. तर पेट्रोल इंजिनमध्ये तर अजून कमी कालावधीत म्हणजे केवळ 5.9 सेकंदात हा वेग गाठते.