
फोटो सौजन्य: Pinterest
भारतात अनेक वर्षांपासून Kawasaki दमदार स्पोर्ट बाईक ऑफर करत आली आहे. कंपनीच्या Ninja सिरीज तर मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आहेत. नुकतेच, कावासाकी इंडियाने त्यांच्या लोकप्रिय निन्जा बाईक्सवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ही माहिती कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया चॅनेल्सद्वारे देण्यात आली आहे. ही ऑफर जानेवारी 2026 च्या अखेरपर्यंत वैध आहे आणि देशभरात लागू आहे.
जर तुम्ही बऱ्याच काळापासून कावासाकी निन्जा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या ऑफरमध्ये फ्लॅगशिप सुपरबाईक्सपासून ते एंट्री-लेव्हल निन्जापर्यंत सर्व काही समाविष्ट आहे.
या ऑफरचा सर्वात मोठा फायदा कावासाकी निन्जा झेडएक्स-10आर ला मिळत आहे. या बाईकवर थेट 2.5 लाखांपर्यंतची सूट मिळत आहे. तरी देखील या बाईकची किंमत 18.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
स्पोर्ट्स-टूरर सेगमेंटमधील निन्जा 1100 एसएक्स वर 1.43 लाखांपर्यंतची सूट मिळत आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपये आहे.
मिडलवेट सुपरस्पोर्ट Ninja ZX-6R वर कोणताही कॅश डिस्काउंट दिला जात नसला, तरी ही बाईक खरेदी केल्यास 83,000 रुपये किमतीचा Ohlins steering damper पूर्णपणे मोफत मिळत आहे. परफॉर्मन्स आणि स्टॅबिलिटीच्या दृष्टीने हा एक मोठा फायदा मानला जातो.
Tata Sierra च्या ‘या’ व्हेरिएंटला 55 टक्के ग्राहकांनी खरेदी केले! नेमकं यामागील कारण काय? जाणून घ्या