फोटो सौजन्य: @MotorOctane (X.com)
आपली स्वतःची कार विकत घेणे हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण अहोरात्र झटत असतात. पण आज कार लोनच्या माध्यमातून अनेकांचे कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.
भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्र नेहमीच विदेशी वाहन उत्पादक कंपन्यांना आकर्षित करत असतात. म्हणूनच तर ग्राहकांना विविध कंपन्यांच्या कारचे ऑप्शन्स उपलब्ध असतात. जेणेकरून ते त्यांच्या बजेटनुसार उत्तम कार निवडू शकतात.
भारतात काही अशा वाहन उत्पादक कंपन्या कार्यरत आहे, ज्यांच्या उत्पादनावर ग्राहकांचा प्रचंड विश्वास आहे त्यातीलच एक कंपनी म्हणेज टाटा मोटर्स. आता तर Tata Punch देशातील मोस्ट सेलिंग कारच्या यादीत आली आहे. जर तुम्ही कमी बजेटमध्ये सुरक्षित आणि उत्तम फीचर्स असलेली एसयूव्ही शोधत असाल, तर टाटा पंच तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.
टाकी फुल्ल केल्यास कापेल 750 km चे अंतर ! फक्त 10 हजारात करा ‘ही’ बजेट बाईक तुमच्या नावावर
टाटा पंच फक्त 6 लाख 20 हजार रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी केले जाऊ शकते. परंतु, सध्या तुम्हाला ही कार खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट थोडे वाढवावे लागेल कारण त्याची किंमत व्हेरियंटनुसार 17000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
जर तुम्ही देशाची राजधानी दिल्लीमध्ये टाटा पंचचा प्युअर व्हेरियंट खरेदी केला तर तुम्हाला त्याची एक्स-शोरूम किंमत 6 लाख 20 हजार रुपये मोजावी लागेल. रोड टॅक्स आणि विम्याच्या चार्जेसनंतर, टाटा पंचची किंमत 7 लाख 23 हजार 760 रुपये होते. EMI आणि व्याजानंतर तुम्हाला ही कार किती डाउन पेमेंटवर मिळेल त्याबद्दल जाणून घेऊया.
10 हजारांपेक्षा कमी पैसे भरून Hunter 350 होईल तुमच्या नावावर, फक्त जाणून घ्या EMI चं संपूर्ण गणित
जर तुम्ही टाटा पंचचा हा प्युअर व्हेरियंट 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट देऊन खरेदी केला तर त्यासाठी तुम्हाला 6 लाख 23 हजार 760 रुपयांचे कार कर्ज घ्यावे लागेल. तुम्हाला हे कर्ज 5 वर्षांसाठी 10 टक्के व्याजदराने मिळेल. अशा प्रकारे, तुम्ही 13,253 रुपयांचा ईएमआय देऊन 60 महिन्यांत हे कर्ज परतफेड करू शकाल. व्याजाबद्दल बोलायचे झाले तर, 5 वर्षांचा ईएमआय आणि 1 लाख रुपयांचा डाउन पेमेंट भरल्यानंतर, एकूण 60 हप्त्यांवर 1 लाख 7 हजार 423 रुपयांचे व्याज भरावे लागेल.
टाटा पंचमध्ये 1.2-लिटर, तीन-सिलेंडर, नॅचरली एस्पिरेटेड (NA) पेट्रोल इंजिन आहे जे 87 bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्ससह येते. याशिवाय, टाटा पंच सीएनजी व्हेरियंटमध्ये देखील उपलब्ध आहे.