Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kawasaki कडून नवीन बाईक लाँच, किंमत एवढी की दारात उभी राहील नवीन कार

जपानी दुचाकी उत्पादक कावासाकी भारतीय बाजारपेठेत विविध सेगमेंटमध्ये बाईक विकते. कंपनीने नुकतीच एक नवीन बाईक लाँच केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 16, 2025 | 03:00 PM
फोटो सौजन्य: @Kawasaki_JPN (X.com)

फोटो सौजन्य: @Kawasaki_JPN (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतात ज्याप्रमाणे लक्झरी कारची क्रेझ पाहायला मिळते, त्याचप्रमाणे लक्झरी बाईकची देखील क्रेझ पाहायला मिळते. अनेक तरुणांचे स्वप्न असते की आपल्याला एकदा तरी या लक्झरी बाईक राइड करायला मिळाव्या. कित्येक तरुण मंडळी आपली ड्रीम बाईक खरेदी करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतात.

भारतात लक्झरी बाईक ऑफर करणाऱ्या अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहे. त्यातीलच एक म्हणजे Kawasaki. कावासाकी कंपनीच्या बाईक नेहमीच तरुणांना आकर्षित करत असतात. तसेच कंपनी देखील जास्तीजास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन बाईक ऑफर करते.

अधिक सुरक्षितता दिलीच पण त्यासोबत किंमतही वाढवली ! Maruti ची ‘ही’ SUV झाली महाग

जपानी दुचाकी उत्पादक कंपनी, कावासाकी भारतात उत्तम फीचर्ससह आणि शक्तिशाली इंजिन असलेल्या अनेक बाईक्स ऑफर करते. कंपनीने फेब्रुवारी 2025 मध्ये एक नवीन बाईक लाँच केली आहे. ही बाईक कोणत्या किंमतीत, कोणत्या प्रकारच्या फीचर्ससह आणि इंजिनसह लाँच केली गेले आहे? याबद्दल जाणून घेऊया.

Kawasaki Versys 1100 बाईक लाँच

कावासाकीने भारतात 1100 सीसी सेगमेंटमध्ये नवीन बाईक म्हणून 2025 Kawasaki Versys 1100 लाँच केली आहे. या बाईकमध्ये एक शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे. यासोबतच अनेक उत्तम फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

कसे आहे फीचर्स?

२०२५ च्या कावासाकी व्हर्सिस 1100 बाईकमध्ये कंपनीने एलईडी लाईट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्पोर्टी डिझाइन, उत्कृष्ट विंड प्रोटेक्शन, अ‍ॅडजस्टेबल विंडस्क्रीन, 21 लिटर पेट्रोल टँक, स्प्लिट सीट्स, अपराईट रायडिंग पोझिशन, 17 इंच अलॉय व्हील्स, टाइप सी चार्जिंग पोर्ट, क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, केसीएमएफ, आयएमयू, असिस्ट आणि स्लिपर क्लच, एबीएस सारखी फीचर्स दिली आहेत.

दमदार इंजिन

कंपनीने व्हर्सिस 1100 बाईकमध्ये 1100 सीसी क्षमतेचे लिक्विड कूल्ड, फोर स्ट्रोक, इन-लाइन फोर, 16 व्हॉल्व्ह इंजिन दिले आहे. ज्यामुळे याला 99 किलोवॅटची शक्ती आणि 112 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. यात 6 स्पीड रिटर्न शिफ्ट ट्रान्समिशन आहे. बाईकमध्ये सेमी-फ्लोटिंग ड्युअल डिस्क देण्यात आल्या आहेत. याशिवाय, त्याचा ग्राउंड क्लिअरन्स 150 मिमी आहे.

8 लाखच्या बजेटमध्ये खरेदी करा 5 क्लासिक SUV कार, उत्तम मायलेजसह मिळतील धमाकेदार फिचर्स

किंमत किती आहे?

या नवीन बाईकमध्ये कावासाकीने 12.90 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली आहे. या बाईकने कंपनीच्या जुन्या Versys 1000 ची जागा घेतली आहे. ही बाईक मेटॅलिक डायब्लो ब्लॅक आणि मेटॅलिक मॅट ग्राफीन स्टील ग्रे रंगात उपलब्ध आहे.

या बाईकसोबत असेल स्पर्धा

2025 ची कावासाकी व्हर्सिस 1100 बाईक सुपर बाईक सेगमेंटमध्ये आणण्यात आली आहे. ज्यामध्ये एक हजार सीसी पेक्षा मोठे इंजिन देण्यात आले आहे. ही बाईक बाजारात थेट BMW M 1000XR, Ducati Multistrada V4 आणि Harley Davidson Pan America 1250 सारख्या अनेक दमदार बाईक्सशी स्पर्धा करणार आहे.

Web Title: New bike kawasaki versys 1100 launched in india know about price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Automobile company
  • Kawasaki Bike price
  • sports Bike

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.