
फोटो साैजन्य: Gemini
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर करत आहे. या सेगमेंटमध्ये काही कार्स तर खूप लोकप्रिय ठरल्या. अशीच एक कार म्हणजे Hyundai Venue. नुकतेच ह्युंदाईने भारतीय ऑटो बाजारपेठेत त्यांच्या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही, Hyundai Venue आणि Venue N Line लाँच केल्या आहेत. दोन्ही कार्स अधिक प्रीमियम डिझाइन, नवीन इंटिरिअर आणि सुधारित फीचर्ससह अपडेट केल्या आहेत.
महत्त्वपूर्ण बदल लक्षात घेता, आज आपण जाणून घेऊयात की ह्युंदाई व्हेन्यूचा कोणता व्हेरिएंट खरेदी करणे तुमच्यासाठी सर्वात फायदेशीर ठरेल.
अनोख्या स्टाईलमध्ये दिसली Tata Sierra, टिझरमध्ये दिसला ट्रिपल स्क्रिन डॅशबोर्ड
नवीन Hyundai Venue ची इंट्रोडक्टरी किंमत 7.90 लाख रुपयांपासून सुरू होते, तर याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 15.69 लाख रुपयांपर्यंत जाते. त्याचप्रमाणे, Venue N Line ची किंमत 10.55 लाख रुपयांपासून सुरू होऊन 15.48 लाख रुपयांपर्यंत आहे.
Venue चे एकूण 8 व्हेरिएंट्स — HX2, HX4, HX5, HX6, HX6T, HX7, HX8, HX10, तसेच स्पोर्टी Venue N Line चे 2 व्हेरिएंट्स N6 आणि N10 असे एकूण 10 पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
नवीन Hyundai Venue मध्ये यापूर्वीप्रमाणेच तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत —
या वेळी सर्वात मोठा अपडेट म्हणजे डिझेल इंजिनमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा समावेश करण्यात आला आहे. Venue N Line मध्ये फक्त 1.0L टर्बो पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे.
Royal Enfield ने इतिहास रचला! बुलेट 650 क्लासिक शैलीत दाखल, मिळणार शक्तिशाली 650cc इंजिन
नवीन Venue सहा मोनोटोन रंगांमध्ये उपलब्ध आहे, Abyss Black, Atlas White, Dragon Red, Hazel Blue, Mystic Sapphire आणि Titan Grey. याशिवाय दोन ड्युअल-टोन पर्याय दिले आहेत, Atlas White + Black Roof आणि Hazel Blue + Black Roof. या ड्युअल-टोनसाठी ₹18,000 अतिरिक्त आकारले जातील.
जर तुम्ही व्हॅल्यू फॉर मनी किंमत शोधत असाल, तर HX5 1.0-लिटर टर्बो पेट्रोल व्हेरिएंट हा एक स्मार्ट पर्याय आहे. त्यात सनरूफ, पुश-बटण स्टार्ट, क्रूझ कंट्रोल, रिमोट इंजिन स्टार्ट आणि उंची-समायोज्य ड्रायव्हर सीट सारख्या अनेक उपयुक्त फीचर्स आहेत. HX6 सह थोडे मोठे बजेट देखील मिळू शकते, परंतु त्यातील अनेक प्रीमियम फीचर्स फक्त टर्बो DCT किंवा डिझेल ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत.