
फोटो सौजन्य: Pinterest
भारतीय बाजारासाठी Nissan आपली रणनीती नव्याने आखत आहे. कंपनी तिसऱ्या जनरेशनच्या Renault Duster च्या प्लॅटफॉर्मवर आधारित एक नवी C-सेगमेंट SUV विकसित करत असून, ही SUV 2026 च्या सुरुवातीला भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. या कारमध्ये नवीन Duster मधील इंजिन आणि फीचर्सचा वापर केला जाणार असला, तरी डिझाइन पूर्णपणे वेगळे आणि नव्या शैलीतील असेल. या SUV मध्ये Nissan Magnite आणि Kait मधील डिझाइन घटकांची झलक दिसू शकते, मात्र भारतात Nissan Kait लॉन्च होण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
Kia Seltos आणि Tata Sierra आमने सामने! कोणती कार तुमच्यासाठी एकदम भारी?
Nissan Kait या SUV ची लांबी 4.30 मीटर, रुंदी 1.76 मीटर आणि व्हीलबेस 2.62 मीटर आहे. यामध्ये 432 लिटरचा मोठा बूट स्पेस देण्यात आला असून, जो कुटुंबासाठी उपयुक्त ठरतो. कंपनीनुसार, केबिनमध्ये पुरेसा हेडरूम आणि लेगरूम मिळणार असल्याने लांब पल्ल्याचा प्रवासही आरामदायी होईल. ही SUV जुन्या Kicks Play प्लॅटफॉर्मवर आधारित असली, तरी याचा लुक आणि फील पूर्णपणे अपडेट करण्यात आला आहे.
Nissan Kait चे डिझाइन आधुनिक आणि स्पोर्टी आहे. समोरच्या बाजूला LED हेडलॅम्प्स आणि शार्प LED DRLs देण्यात आले असून, नवीन स्लॅट डिझाइन ग्रिल SUV ला दमदार लूक देते. फ्रंट बंपरमध्ये वाइड एअर इनटेक दिला आहे. साइड प्रोफाइलमध्ये गोल व्हील आर्च, मजबूत अलॉय व्हील्स आणि रूफ रेल्समुळे SUV अधिक मस्क्युलर दिसते. ORVM आणि काही डिझाइन एलिमेंट्समध्ये Kicks Play ची झलक पाहायला मिळते.
ग्लोबल मार्केटमध्ये Nissan Kait ही SUV चार ट्रिम्समध्ये उपलब्ध असेल. यात 9-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आला असून, तो वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट करतो. याशिवाय, 7-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस फोन चार्जर, डिजिटल व ऑटोमॅटिक एसी, क्रूझ कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा आणि ADAS टेक्नोलॉजी यांसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. सुरक्षितता आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत ही SUV मजबूत ठरते.
अखेर New Kia Seltos च्या किमतीबाबत झाला खुलासा! किंमत फक्त ‘इतक्या’ लाख रूपयांपासून सुरु
Nissan Kait मध्ये 1.6 लिटर नॅचरली एस्पिरेटेड फ्लेक्स-फ्युएल इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोलवर हे इंजिन 110 बीएचपी पॉवर आणि 146 एनएम टॉर्क निर्माण करते, तर इथेनॉलवर पॉवर 113 बीएचपी आणि टॉर्क 149 एनएम पर्यंत वाढतो. या SUV मध्ये CVT गिअरबॉक्स देण्यात आला असून, कंपनीच्या दाव्यानुसार शहरात ही कार सुमारे 11 किमी प्रति लिटर मायलेज देऊ शकते.