Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिझाइन अफाट आणि रेंज सुसाट! Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल तर आजच बुक कराल

महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी लिमिटेड (एमएलएमएमएल) ने भारतात त्यांची इलेक्ट्रिक ऑटो लाँच केली आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या दाव्यानुसार ही ऑटो 200 किमीची प्रत्यक्ष रेंज देऊ शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 19, 2026 | 06:13 PM
Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल तर आजच बुक कराल

Mahindra Udo ई-ऑटो लाँच, किंमत वाचाल तर आजच बुक कराल

Follow Us
Follow Us:
  • Mahindra Udo ही ई-ऑटो लाँच
  • या ई ऑटोची एक्स-शोरूम किंमत 3,84,299 रुपये ठेवण्यात आली आहे
  • मिळू शकते 200 किमी प्रत्यक्ष ड्रायव्हिंग रेंज
भारतातील क्रमांक 1 इलेक्ट्रिक कमर्शियल वाहन उत्पादक कंपनी Mahindra लास्ट माइल मोबिलिटी लिमिटेड (एमएलएमएमएल) ने लास्ट माईल मोबिलिटी क्षेत्रात नवे पर्व सुरू करत सर्व-नवीन इलेक्ट्रिक तीनचाकी ‘महिंद्रा उडो’ बाजारात सादर केली आहे. एक्स-शोरूम किंमत ₹3,84,299 ठेवण्यात आली असून, मर्यादित कालावधीसाठी ही ई-ऑटो ₹3,58,999 या विशेष किमतीत उपलब्ध असणार आहे.

विमान-प्रेरित डिझाइन, सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच मोनोकॉक बांधणी

‘ऑटोप्लेन’ या संकल्पनेवर आधारित उडोचे एरोडायनॅमिक डिझाइन, दमदार हेडलॅम्प्स, स्टायलिश मिरर्स आणि मोठे विंडशील्ड यामुळे रस्त्यावर वेगळी ओळख निर्माण होते. सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच पूर्ण मोनोकॉक स्ट्रक्चर वापरल्याने अधिक मजबूत बांधणी आणि सुधारित राइड क्वालिटी मिळते. डिझाइनचे नेतृत्व महिंद्राच्या डिझाइन टीमने केले असून, चालकांच्या व्यावसायिक प्रतिमेला नवी उंची देणे हा उद्देश आहे.

Hyundai Exter च्या Facelift व्हर्जनची तयारी सुरु, लाँच होण्याअगोदरच मिळाली ‘ही’ माहिती

आरामदायी ‘पायलट सीट’ आणि फर्स्ट-क्लास प्रवासी अनुभव

उडोमध्ये चालकासाठी 20% अधिक जाड ‘पायलट सीट’ देण्यात आली आहे. प्रवाशांसाठी अधिक लेगरूम व हेडरूमसह ‘फर्स्ट-क्लास’ आसनव्यवस्था देण्यात आली असून, स्वतंत्र रिअर सस्पेन्शन आणि ड्युअल-फोर्क फ्रंट सस्पेन्शनमुळे खडबडीत रस्त्यावरही स्मूथ राइड मिळते.

200 किमी प्रत्यक्ष रेंज; स्मार्ट ड्राइव्ह मोड्स

उडो प्रत्यक्ष वापरात 200 किमीपर्यंत रेंज देते (ARAI प्रमाणित 265 किमी). यात IP67-रेटेड 11.7 kWh लिथियम-आयन बॅटरी, PMS मोटरमधून 10 kW पीक पॉवर व 52 Nm टॉर्क मिळतो. ‘रेंज’, ‘राइड’ आणि ‘रेस’ असे तीन ड्राइव्ह मोड्स उपलब्ध असून, ‘रेस’ मोडमध्ये 55 किमी/तास टॉप स्पीड मिळतो. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, उद्योगात पहिल्यांदाच देण्यात आलेला रिव्हर्स थ्रॉटल, हिल होल्ड असिस्ट आणि क्रीप फंक्शन यामुळे ट्रॅफिकमध्ये अधिक अचूक नियंत्रण साधता येते.

5 Seater SUV च्या मागणीत चांगली वाढ! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top-5 वाहनांनी जिंकलाय ग्राहकाचा विश्वास

सुरक्षिततेवर भर; 1 लाख किमी मोफत सर्व्हिस

उडोला 1.5 लाख किमी किंवा 6 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. शक्तिशाली ड्रम ब्रेक्समुळे कमी ब्रेकिंग अंतर, तसेच 30.48 सेमी ट्यूबलेस टायर्समुळे स्थिरता वाढते. कंपनी 1 लाख किमीपर्यंत मोफत सर्व्हिस देत असून, ‘उदय एनएक्सटी’ योजनेअंतर्गत ₹20 लाखांचे अपघाती विमा संरक्षण व इतर लाभ दिले जातात.

उडोचे उत्पादन महिंद्राच्या जहिराबाद येथील अत्याधुनिक प्रकल्पात केले जाणार आहे. कंपनीच्या मते, लास्ट माईल मोबिलिटी अधिक सन्माननीय आणि शाश्वत बनवण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा आहे.

Web Title: Electric auto rickshaw mahindra udo launch under 4 lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • auto rickshaw
  • automobile
  • Mahindra

संबंधित बातम्या

Best Turbo Petrol SUVs in India: टर्बो इंजिनची पॉवर, SUVचा दमदार अंदाज! भारतातल्या ‘या’ 5 गाड्या बजेटमध्ये भारी
1

Best Turbo Petrol SUVs in India: टर्बो इंजिनची पॉवर, SUVचा दमदार अंदाज! भारतातल्या ‘या’ 5 गाड्या बजेटमध्ये भारी

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती
2

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर
3

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!
4

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.