Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nissan : जूनमध्ये निसानच्या विक्रीला वेग; देशांतर्गत विक्रीत 129 टक्क्यांची दमदार वाढ

निसान मोटर इंडियाने जून 2026 मध्ये देशांतर्गत विक्रीत 129 टक्क्यांची दमदार वार्षिक वाढ नोंदवत 3,006 गाड्यांची विक्री केली. याच कालावधीत 5,340 गाड्यांची निर्यात झाल्याने कंपनीची एकूण होलसेल विक्री 8,346 वाहनांवर पोहोचली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 01, 2026 | 07:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

निसान मोटर इंडिया प्रा. लि.ने जून 2026 मधील विक्रीचे आकडे जाहीर करत भारतीय बाजारपेठेतील मजबूत कामगिरीची नोंद केली आहे. कंपनीने जून महिन्यात 3,006 गाड्यांची देशांतर्गत होलसेल विक्री केली असून, ती मागील वर्षाच्या तुलनेत 129 टक्क्यांनी अधिक आहे. देशांतर्गत विक्रीत सलग चौथ्या महिन्यात वाढ नोंदवत निसानने भारतीय बाजारपेठेतील आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. याशिवाय 5,340 गाड्यांची निर्यात करण्यात आली असून, एकूण 8,346 गाड्यांची होलसेल विक्री झाली आहे. ही कामगिरी वार्षिक 16 टक्के वाढ दर्शवते.

EV Policy Delhi: दिल्लीत नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंजुरी; ईव्ही खरेदीवर मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतची मोठी सवलत

या यशाबद्दल बोलताना निसान मोटर इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांनी सांगितले की, सलग चार महिन्यांपासून होत असलेली देशांतर्गत विक्रीतील वाढ ही ग्राहकांचा निसानच्या उत्पादनांवरील वाढता विश्वास आणि कंपनीच्या बाजारपेठेतील धोरणाला मिळत असलेले यश अधोरेखित करते. डीलर्स, व्यावसायिक भागीदार आणि कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण योगदानामुळे भारतातील निसानची उपस्थिती अधिक मजबूत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कंपनीच्या न्यू निसान मॅग्नाइट आणि ऑल न्यू निसान ग्रॅव्हाइट या मॉडेल्सना ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्याचा थेट परिणाम विक्रीवर होत आहे. विशेषतः मॅग्नाइट हे मॉडेल भारतातील निसानच्या वाढीचा प्रमुख आधार बनले आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आणि विस्तारणारे डीलर नेटवर्क यामुळे कंपनीला आगामी काळातही विक्रीचा वेग कायम राहील, असा विश्वास आहे.

दरम्यान, निसान 9 जुलै 2026 रोजी आपल्या नव्या ‘निसान टेक्टॉन’ या मॉडेलचे जागतिक स्तरावर अनावरण करणार आहे. कंपनीच्या ‘इंडिया रिसर्जन्स स्टोरी’ मधील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भारतातील उत्पादन पोर्टफोलिओ अधिक विस्तारण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल ठरणार आहे.

CNG वाहनधारकांसाठी महत्त्वाचे! दर तीन वर्षांनी CNG सिलेंडरची ‘हायड्रो-टेस्टिंग’ करणे अनिर्वार्य! ‘हे’ चुकवले तर बेतू शकते जीवावर

निसानने भविष्यात देशांतर्गत विक्रीचा वेग कायम ठेवण्याबरोबरच डीलर नेटवर्कचा विस्तार, ग्राहकांचा अनुभव अधिक सक्षम करणे आणि भारताला उत्पादन तसेच निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र बनवण्यावर भर देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. कंपनीच्या सातत्यपूर्ण वाढीमुळे भारतीय वाहन बाजारपेठेत निसानची उपस्थिती आणखी बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Nissans sales gain momentum in june robust 129 growth in domestic sales

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • auto mobile news
  • nissan
  • Nissan Magnite

संबंधित बातम्या

लाँचपूर्वीच समोर आला निसान ‘टेक्टॉन’चा दमदार लूक; ‘या’ दिवशी होणार जागतिक एन्ट्री
1

लाँचपूर्वीच समोर आला निसान ‘टेक्टॉन’चा दमदार लूक; ‘या’ दिवशी होणार जागतिक एन्ट्री

Tata Sierra EV: टाटा सिएरा EV लाँचपूर्वीच वाढली उत्सुकता; समोर आले फीचर्स आणि रेंज
2

Tata Sierra EV: टाटा सिएरा EV लाँचपूर्वीच वाढली उत्सुकता; समोर आले फीचर्स आणि रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.