फोटो सौजन्य: Social Media
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये अनेक वाहनं लाँच होत आहे. त्यातही विशेषकरून टू व्हीलर सेगमेंटमध्ये अनेक ऑटो कंपन्या जबरदस्त फीचर्स असणारी वाहनं लाँच करत आहे. आज इलेक्ट्रिक स्कूटर म्हंटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर OLA Electric चे नाव समोर येते. पण आता या कंपनीला टक्कर देण्यासाठी Ultraviolette सज्ज झाली आहे.
भारतीय बाजारपेठेत, सामान्य इलेक्ट्रिक वाहनांसोबत, परफॉर्मन्स सेगमेंटमध्येही बाईक्स उपलब्ध आहेत. देशातील स्टार्टअप कंपनी अल्ट्राव्हायोलेटने 5 मार्च 2025 रोजी दोन नवीन वाहने लाँच केली आहेत. कंपनीने ही वाहने कोणत्या सेगमेंटमध्ये लाँच केली आहेत? ते कोणत्या प्रकारच्या फीचर्ससह आणले आहेत? ही वाहनं किती किमतीत खरेदी करता येतील? याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
टाटा मोटर्सचे ट्रक आता हायड्रोजनवर धावणार, काय आहेत हायड्रोजन फ्यूएलचे फायदे तोटे?
अल्ट्राव्हायोलेटने दोन नवीन वाहने लाँच करून भारतीय बाजारपेठेत आपला पोर्टफोलिओ वाढवला आहे. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक ऑफ रोड बाईक सेगमेंटमध्ये नवीन वाहने सादर केली आहेत.
कंपनीने अल्ट्राव्हायोलेट Tesseract नावाची एक नवीन स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये 14 इंच अलॉय व्हील्स, 34 लिटर अंडर सीट स्टोरेज, इंटिग्रेटेड रडार आणि डॅशकॅमसह जगातील पहिला ओमनीसेन्स सेन्सर, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन आणि ओव्हरटेक असिस्ट, रिअल टाइम कोलिजन अलर्ट, सात इंच टीएफटी डिस्प्ले, 261 किमी आयडीसी रेंज, मोटरमधून 20 बीएचपी पॉवर, फ्लोटिंग डीआरएलसह एलईडी ड्युअल प्रोजेक्टर लाईट्स अशा उत्कृष्ट फीचर्ससह प्रदान केले आहे.
अल्ट्राव्हायोलेटने ऑफ-रोडिंग इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. या बाईकला अल्ट्राव्हायोलेट शॉकवेव्ह असे नाव देण्यात आले आहे. यात 17 आणि 19 इंच स्पोक्ड व्हील्स, 165 किलोमीटरची रेंज, 14.5 बीएचपी पॉवर आणि 505 न्यूटन मीटर टॉर्क आहे.
कंपनीने 1.45 लाख रुपयांना अल्ट्राव्हायोलेट टेसरॅक्ट इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. पण ही स्कूटर पहिल्या 50 हजार लोकांना 1.3 लाख रुपयांमध्ये दिली जाईल.
याशिवाय, अल्ट्राव्हायोलेट शॉकवेव्ह बाईक पहिल्या हजार लोकांसाठी 1.49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत आणण्यात आली आहे. दोन्ही उत्पादनांच्या किंमती सुरुवातीच्या आहेत आणि नंतर बदलू शकतात. कंपनीच्या स्कूटर आणि बाईक 999 रुपयांना बुक करता येतील.
अल्ट्राव्हायोलेटने लाँच केलेल्या स्कूटर आणि बाईक्स भारतीय बाजारपेठेत ओला, एथर, टीव्हीएस, बजाज, हिरो विडा, ओबेन, रिव्हॉल्ट सारख्या कंपन्यांना चांगली स्पर्धा देतील.