फोटो सौजन्य: @sagarcasm (X.com)
भारतीय ऑटो बाजारात टाटा मोटर्सचा सर्वाधिक मार्केट शेअर आहे. टाटाने ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार आणि विश्वासार्ह कार्स सादर केल्या आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक कार खरेदी करताना टाटाची निवड प्राधान्याने करतात. कंपनी सणासुदीच्या काळात आकर्षक सवलती देत असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद अधिक वाढतो. टाटाच्या कार्समध्ये सुरक्षा, डिझाईन आणि मायलेजचा उत्तम समतोल दिसून येतो. याशिवाय, टाटा मोटर्स सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर विशेष भर देत आहे. त्यांच्या EV लाइनअपमुळे पर्यावरणपूरक वाहनांसाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. देशांतर्गत ग्राहकांमध्ये टाटाचा ब्रँडविश्वास दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यानंतर कार चालवणे महाग झाले आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येकाला अशी कार हवी असते जी परवडणाऱ्या किमतीत चांगले मायलेज देईलच, पण यासोबतच यात उत्तम फीचर्स देखील असेल.
फ्रंट की रिअर, बाईक चालवताना कोणता ब्रेक पहिला वापराल?
सध्या इलेक्ट्रिक कार तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतात, कारण या कार चालवण्याचा खर्च कमी असतो. टाटा टियागो ईव्ही ही त्यातीलच एक लोकप्रिय कार आहे.
जर तुम्ही दिल्लीमध्ये टाटा टियागो ईव्हीचा बेस व्हेरिएंट खरेदी केले तर तुम्हाला आरटीओ शुल्क आणि विमा रक्कमेसह सुमारे 8.44 लाख रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही टियागो ईव्ही खरेदी करण्यासाठी 3 लाख रुपये डाउन पेमेंट म्हणून जमा केले तर उर्वरित रकमेसाठी तुम्हाला बँकेकडून 5.44 लाख रुपये लोन घ्यावे लागेल.
यासोबतच, जर तुम्हाला ही रक्कम 7 वर्षांसाठी 8 टक्के व्याजदराने मिळाली तर तुम्हाला सुमारे 8 हजार रुपये EMI द्यावे लागेल. 7 वर्षांसाठी कार लोन घेतल्यास, तुम्हाला सुमारे 1 लाख 68 हजार रुपये व्याज म्हणून द्यावा लागेल.
Honda कडून पहिल्या वाहिल्या इलेक्ट्रिक बाईकचा टिझर लाँच, ‘या’ दिवशी होणार सादर
टाटा टियागो ईव्ही दोन व्हेरिएंटमध्ये ऑफर केली जाते. याच्या बेस मॉडेलला पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 250 किमीची रेंज आहे, तर टॉप व्हेरिएंटमध्ये 315 किमीची रेंज मिळेल. टियागो ईव्हीच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 24 किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे. ही ईव्ही डीसी 25 किलोवॅट फास्ट चार्जर वापरून 58 मिनिटांत 10-80 टक्के चार्ज करता येते, तर नियमित 15Amp होम चार्जर वापरून पूर्ण चार्ज होण्यासाठी १५ ते १८ तास लागतात.