फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची बाईक असावी हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक दिवसरात्र मेहनत करत असतात. मात्र, बाईक खरेदी करण्यापूर्वी अनेक जण बाईक चालवण्याचे प्रशिक्षण घेत असतात. यातही बाईक चालवताना काही जण सांगतात की फ्रंट ब्रेक वापरावा तर काही जण सांगतात रिअर ब्रेक वापरावा. त्यामुळेच फ्रंट ब्रेक की रिअर? याबाबत अनेक दुचाकीस्वार गोंधळलेले असतात.
अनेकदा तुम्ही पाहिले असेल की बाईक किंवा स्कूटर चालवताना लोक अचानक पडतात, तेही जेव्हा रस्ता पूर्णपणे मोकळा आणि सरळ असतो. अशा अपघातांचे सर्वात सामान्य कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने ब्रेक लावणे. जर तुम्ही नकळत मागचा ब्रेक दाबला तर तुमची बाईक थांबविण्याऐवजी घसरू शकते किंवा ब्रेक लॉक होऊ शकतो. म्हणूनच ब्रेक लावण्याची योग्य पद्धत जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.
‘या’ इलेक्ट्रिक बाईकसाठी ग्राहक अक्षरशः तरसलेत, August 2025 मध्ये होणार लाँच
ताबडतोब दुचाकी थांबवण्यासाठी पुढचा ब्रेक सर्वात प्रभावी असतो. जेव्हा तुम्ही ब्रेक लावता तेव्हा दुचाकीचे जास्त वजन पुढच्या चाकावर येते. म्हणून, जर तुम्ही पुढचा ब्रेक वापरला तर दुचाकी लवकर आणि सुरक्षितपणे थांबते. उलट, मागचा ब्रेक दुचाकीचा वेग हळूहळू कमी करतो. जर तुम्ही फक्त मागच्या ब्रेकवर अवलंबून राहिलात तर दुचाकी उशिरा थांबेल आणि घसरण्याचा धोका जास्त असेल.
70-30 ब्रेकिंगचा नियम बाईक सुरक्षितपणे थांबवण्यासाठी सर्वात प्रभावी मानला जातो. या नियमानुसार, ब्रेक लावताना, पुढच्या ब्रेकवर 70% आणि मागच्या ब्रेकवर 30% दाब द्यावा. या संतुलित ब्रेकिंग तंत्रज्ञानामुळे बाईक घसरण्यापासून रोखली जाते आणि रायडरला वाहनावर चांगले संतुलन मिळते. ज्यामुळे बाईक योग्य वेळी थांबते आणि अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते.
Honda कडून पहिल्या वाहिल्या इलेक्ट्रिक बाईकचा टिझर लाँच, ‘या’ दिवशी होणार सादर
खरंतर, प्रत्येक रस्त्यावर ब्रेक लावण्याची पद्धत सारखी असू शकत नाही. सरळ आणि सपाट रस्त्यांवर पुढचा ब्रेक जास्त वापरणे सुरक्षित आहे कारण त्यामुळे बाईक लवकर आणि स्थिरपणे थांबते, परंतु जेव्हा तुम्ही कर्व्ह किंवा अरुंद रस्त्यावर असता तेव्हा समोरचा ब्रेक लावणे धोकादायक ठरू शकते, कारण बाईक घसरण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत, प्रथम मागील ब्रेकने स्पीड कमी करा, नंतर हळूहळू पुढचा ब्रेक वापरा. दुसरीकडे, जर रस्त्यावर वाळू, रेती किंवा पाणी असेल तर अचानक ब्रेक लावल्याने बाईक घसरू शकते. अशा वेळी योग्य खबरदारी घ्या.