फोटो सौजन्य: Freepik
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये जगभरातील खेळाडू त्यांच्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. आपल्या भारतासाठी सुद्धा ही ऑलिम्पिक दिवसेंदिवस चांगली होत आहे. आतापर्यंत भारताला तीन कांस्यपदक मिळाले आहे. नुकतेच महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्नील कुसळे याने देशाला कांस्यपदक मिळवून दिले. त्याच्या याच कामगिरीबद्दल राज्य सरकारने त्याला 1 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.
भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहता JSW Group चे चेअरमेन एमडी सज्जन जिंदल यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदक मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंना आगामी MG Windsor EV भेट देऊन सन्मानित करणार असल्याची घोषणा केली आहे.
X वर पोस्ट करत जिंदल म्हणाले,” टीम इंडियाच्या प्रत्येक ऑलिम्पिक पदक विजेत्याला JSW MG India कडून MG Windsor ही दर्जेदार कार भेट दिली जाईल हे जाहीर करताना आनंद होत आहे!
MG Motor India ने अलीकडेच त्याच्या आगामी ऑल-इलेक्ट्रिक क्रॉसओवरला Windsor EV असे नाव दिले जाईल असे जाहीर केले होते. हे कंपनीचे भारतातील तिसरी इलेक्ट्रिक कार असेल. यापूर्वी कंपनीकडून ZS EV आणि Comet EV भारतीय बाजारपेठेत लाँच केले गेले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विंडसर Ev ला Cloud EV या नावांतर्गत विकले जाते. विंडसर EV ची रचना सेडानमधील कम्फर्ट आणि स्पेस एकत्र करण्यासाठी डिजाइन केले आहे. जे लोक अशी इलेक्ट्रिक कार शोधात आहात जी लक्झरी असेल, अशांसाठी ही कार एक उत्तम पर्याय असणार आहे.
सप्टेंबरमध्ये लाँच होण्याच्या तयारीत असलेल्या या इलेक्ट्रिक कारची किंमत 15 ते 20 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. भारतीय बाजारपेठेत, विंडसर Ev ची थेट स्पर्धा Tata Nexon EV आणि Mahindra XUV400 सारख्या इलेक्ट्रिक SUV शी होईल.