फोटो सौजन्य: iStock
सणासुदीचा काळ चालू झाला आहे. या काळात अनेक जण नवीन कार विकत घेत असतात. काही जण तर सेकंड हँड कार सुद्धा विकत घेतात. या काळात सर्वच ऑटो कंपनीज आपल्या सध्याच्या आणि येणाऱ्या कार्सवर भरघोस डिस्कॉउंट्स सुद्धा देतात, ज्यामुळे जास्तीजास्त ग्राहक नवीन कार्सकडे आकर्षित होऊ लागतात.
कार विकत घेण्यापेक्षा तिला मेंटेन ठेवणे कठीण असते हे आपण सर्वच जाणतो. त्यामुळेच ठराविक वेळानंतर कारमध्ये खराबी येण्यास चालू होते. जर तुम्हाला तुमच्या कारचा उपयोग दीर्घ कालावधीपर्यंत करायचा असेल तर तिची काळजी घेणे फार गरजेचे आहे. परंतु अनेक लोक कारबाबत निष्काळजीपणा करतात आणि नंतर त्यांचे नुकसान होते. अशा निष्काळजीपणामुळे अनेक वेळा इंजिन जास्त गरम होते. हे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
हे देखील वाचा: Yamaha कडून दिवाळी निमित्त आकर्षक ऑफर्स ! FZ आणि स्कूटर खरेदीवर आणली खास योजना
कारकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास त्यात अनेक समस्या उद्भवतात ज्यामुळे तुमचेच नुकसान होऊ शकते. अशीच एक समस्या म्हणजे इंजिन ओव्हरहीट. जर बराच वेळ कार चालवली जात असेल तर इंजिनचे तापमान वाढू लागते आणि काही काळानंतर इंजिन ओव्हरहाट होण्याची समस्या उद्भवू शकते.
दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे उष्ण तापमानातही कार सतत चालवल्याने इंजिनचे तापमान सामान्यपेक्षा जास्त होण्याचा धोका असतो. इंजिन जास्त गरम होण्याचे तिसरे कारण म्हणजे कारमधील गळती.
जर तुम्हाला तुमच्या कारचे इंजिनही जास्त गरम होत असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे. सर्व प्रथम, इंजिन जास्त तापले असेल तर कार चालवू नये. कारला थोडा आराम द्या. असे न केल्यास इंजिनचे मोठे नुकसान होऊ शकते.
हे देखील वाचा: Maruti Suzuki च्या ‘या’ कारची परदेशातही भुरळ ! 900 हून जास्त टक्क्यांनी वाढली निर्यात
सुरक्षित ठिकाणी कार थांबवल्यानंतर रेडिएटर कॅप कधीही उघडू नये. असे न केल्याने, रेडिएटरमध्ये असलेले गरम कूलंट बाहेर येते आणि अपघाताचा धोका वाढतो. जर कोणी असे केले तर त्या व्यक्तीस इजा होण्याचा धोका वाढतो.
जर कारचे इंजिन जास्त गरम होत असेल तर कारमधील गळती देखील तपासली पाहिजे. कारमधून कोठूनही कूलंट लीक होत असले तरी, कार जास्त गरम होण्याची समस्या उद्भवते. जर तुम्हाला कारची स्तिथी कळत नसेल तर एखाद्या चांगल्या मेकॅनिककडे जाऊन कार तपासा, जेणेकरून पुढे येणाऱ्या समस्येला आपण आधीच रोखू शकू.