फोटो सौजन्य: Social Media
नवीन वर्षात अनेक ऑटो कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे अनेक ग्राहकांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. उत्पादनातील खर्च वाढत असल्यामुळे वाहनांची किंमत वाढवत आहोत असे स्पष्टीकरण अनेक कंपन्यांनी दिले. काही कंपन्यांनी वाहनांच्या किंमती 20 ते 30 टक्के वाढवले आहे. वाहनांच्या या दरवाढीमुळे अनेक ग्राहकांनी डिसेंबर 2024 मध्येच कार खरेदी केली होती.
फ्रेंच ऑटोमोबाईल उत्पादक Citroen भारतीय बाजारपेठेत अनेक सेगमेंटमध्ये वाहने ऑफर करते. आता कंपनीने कूप एसयूव्ही म्हणून ऑफर केलेल्या Citroen Basalt ची किंमत वाढवली आहेत. नवीन वर्षात कंपनीने या कूप एसयूव्हीच्या कोणत्या व्हेरियंटच्या किमती वाढवल्या आहेत, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
‘या’ देशात चक्क आहे Blue Traffic Light, 99 % लोकांना याचा अर्थच माहित नाही
सिट्रोएनने कूप एसयूव्ही म्हणून ऑफर केलेल्या बेसाल्ट एसयूव्हीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. नवीन वर्ष सुरू होताच कंपनीने आपल्या किमती वाढवल्या आहेत. या दरवाढीची माहिती कंपनीने डिसेंबर 2024 मध्येच दिली होती.
कंपनीच्या म्हणण्यानुसार या कारच्या किंमती दोन टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. परंतु सर्व व्हेरियंटच्या किमती वाढवल्या जाणार नसल्याचे आधीच कंपनीने जाहीर केले होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, इनपुट कॉस्टमध्ये सतत वाढ होत होती आणि एक्सचेंज कॉस्टमध्ये झालेल्या बदलांमुळे जानेवारी 2025 मध्ये किंमती दोन टक्क्यांनी वाढल्या आहेत.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने 2024 मध्ये केली ताबडतोड विक्री, डिसेंबरचा महिना सुद्धा ठरला खास
माहितीनुसार, कंपनीने ऑफर केलेल्या बेस व्हेरिएंट 1.2 लिटर नॅचरली एस्पिरेटेड You च्या किंमतीत 26 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 1.2 लीटर टर्बो पेट्रोल मॅक्स मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकच्या किमतीत 21 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. टर्बो पेट्रोल मॅक्सच्या किंमतीत 17 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, तर १.२ लिटर टर्बो पेट्रोल प्लस मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकच्या किंमती 28 हजार रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. त्याच्या मिड व्हेरिएंट 1.2 लीटर NA Plus च्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
Citroen च्या Basalt SUV ची एक्स-शोरूम किंमत आता 8.25 लाख रुपयांपासून सुरू होईल आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 14 लाख रुपये आहे.
Citroen’s Basalt फक्त 2024 मध्ये coupe SUV सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आली होती. कंपनीने या एसयूव्हीमध्ये उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स दिले आहेत. Tata Curvv व्यतिरिक्त, बाजारात त्याची थेट स्पर्धा मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायराइडर, Hyundai Verna, Kia Seltos सारख्या SUV सोबत आहे.