होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने 2024 मध्ये केली ताबडतोड विक्री, डिसेंबरचा महिना सुद्धा ठरला खास
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने डिसेंबर २०२४ मधील आपल्या विक्री आकडेवारीची घोषणा केली. डिसेंबर २४ मध्ये कंपनीच्या एकूण ३,०८,०८३ युनिट्सची विक्री झाली. यामध्ये २,७०,९१९ युनिट्सची देशांतर्गत विक्री आणि निर्यात करण्यात आलेल्या ३७,१६४ युनिट्सचा समावेश आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, एचएमएसआयचे कॅलेंडर वर्ष २०२४ साठी होलसेल ५८,०१,४९८ युनिट्स राहिले, ज्यामध्ये कॅलेंडर वर्ष २०२३ च्या तुलनेत वार्षिक ३२ टक्क्यांची वाढ झाली. यामध्ये ५२,९२,९७६ युनिट्सची देशांतर्गत विक्री आणि निर्यात करण्यात आलेल्या ५,०८,५२२ युनिट्सचा समावेश आहे.
नवीन ऑफरिंग्स: एचएमएसआयने इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या सेगमेंटमध्ये ‘अॅक्टिव्हा ई:’ आणि ‘क्यूसी१’ इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच केल्या आहेत. याचे बुकींग १ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार असून डिलिव्हरीज फेब्रुवारी २०२५ पासून होईल. याच महिन्यात भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये या स्कूटर्सच्या किंमती जाहीर केल्या जातील. तसेच, ओबीडी२बी प्रमाणित मॉडेल्सच्या अंतर्गत ‘अॅक्टिव्हा १२५’, ‘एसपी१२५’, ‘एसपी१६०’ आणि ‘युनिकॉर्न’ लाँच झाले आहेत.
Maruti Brezza की Tata Nexon, कोणती कार देते जास्त मायलेज? जाणून घ्या सेफ्टी आणि अन्य फीचर्स
प्रीमियम मोटरसायकल बिझनेस: एचएमएसआयने ‘एनएक्स५००’ अॅडव्हेंचर टूरर लाँच केले, जे विविध प्रकारच्या खडतर रस्त्यांवर साहसी राइडिंग अनुभव देणारा आहे. ‘सीबी३००एफ फ्लेक्स-फ्यूल’ मोटरसायकलही लॉन्च केली, जी भारतातील पहिली ३००सीसी फ्लेक्स-फ्यूल मोटरसायकल आहे, आणि देशातील हरित गतीशीलता सोल्यूशन्सकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
व्यवसाय व ब्रँड टप्पे: एचएमएसआयने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी गुजरातमधील विठलपूर येथील नवीन असेम्बली लाइन सुरू केली. कंपनीने भारतात ६ कोटी विक्रीचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे.
रस्ता सुरक्षा: एचएमएसआयने भारतभर रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम राबवली, ज्यात १०० हून अधिक शहरांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि सरकारी संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यांनी ८५ लाख नागरिकांना रस्ता सुरक्षा महत्त्वाबद्दल जागरूक केले.
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी: एचआयएफने ‘प्रोजेक्ट प्रगती’ आणि ‘प्रोजेक्ट बुनियाद’ सुरू केले. ‘स्त्री सारथी’ उपक्रमांतर्गत महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण दिले. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटी आणि जागतिक पर्यावरण दिन साजरा केला, ज्यात १ लाख झाडांची लागवड केली.
हिवाळ्यात तुमच्या वाहनासाठी Power Petrol चांगले की Normal? ‘हा’ निणर्य वाढवेल मायलेज
मोटरस्पोर्ट्स: होंडा इंडिया टॅलेंट कपमध्ये मोहसीन परंबनने अव्व्ल स्थान मिळवला. इडेमित्सू होंडा रेसिंग इंडियाच्या केव्हिन क्विंटल आणि मोहसीन परंबन यांनी एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशिप फिनालेमध्ये प्रवेश केला. तसेच, डकार रॅली २०२४ मध्ये रिकी ब्रॅबेकने विजेतेपद पटकावले.
ही वर्षभरातील एचएमएसआयची महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत, ज्यात नवीन उत्पादने, सामाजिक उपक्रम आणि मोटरस्पोर्ट्समध्ये महत्त्वपूर्ण यश समाविष्ट आहे.