Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीयांची आवडती Toyota Fortuner झाली महाग, व्हेरियंटनुसार वाढल्या किंमती

टोयोटा कंपनीची लोकप्रिय फॉर्च्युनर कारमध्ये अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळतात. पण आता या एसयूव्हीची किंमत वाढली आहे. चला जाणून घेऊया कोणत्या व्हेरियंटची किंमत किती रुपयांनी वाढली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 16, 2025 | 07:30 AM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर होत असतात. अनेक ऑटो कंपन्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये सुद्धा कार ऑफर करत असतात. आपल्या देशात एसयूव्ही कारबद्दल खूप क्रेझ आहे. एसयूव्ही कारमध्ये अनेक दमदार फीचर्स असतात जे या कारला इतर कारपेक्षा वेगळे बनवते.

देशात अनेक एसयूव्ही कार लोकप्रिय आहेत. पण त्यातही टोयोटा फॉर्च्युनरच्या लोकप्रियतेची सर दुसऱ्या कारला नाही. अनेक सेलिब्रेटीज आणि नेतेमंडळी ही एसयूव्ही वापरताना दिसतात, याचे कारण म्हणजे त्यातील सेफ्टी फीचर्स.

Kia Syros Vs Skoda Kylaq: कोणती कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर?

आजही टोयोटा फॉर्च्युनरचा मालक असणे हे आपल्याकडे प्रतिष्ठेचे मानले जाते. ही एक मोठ्या आकाराची एसयूव्ही आहे. पण आता ही एसयूव्ही खरेदी करणे महागले आहे. जर तुम्ही टोयोटा फॉर्च्युनर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनीने या मोठ्या आकाराच्या एसयूव्हीची किंमत 50000 रुपयांनी वाढवली आहे.

कोणत्या व्हेरियंटची किती वाढवली किंमत?

टोयोटा फॉर्च्युनरच्या स्टॅंडर्ड GR-S व्हेरियंटची किंमत 50 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे, तर 2.8-लिटर, डिझेल इंजिन ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल असलेल्या 4×2 आणि 4×4 व्हेरियंटची किंमत 40 हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे. याशिवाय, 2.7-लिटर पेट्रोल मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक 4×2 व्हेरियंटच्या किंमतीत 35 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, टोयोटा फॉर्च्युनरची किंमत सध्या 33.78 लाख रुपये ते 51.94 लाख रुपये एक्स-शोरूम दरम्यान आहे. टोयोटा फॉर्च्युनर 4×2 आणि 4×4 ड्राइव्हट्रेनसह अनेक व्हेरियंटमध्ये येते.

MG ने वाढवल्या ‘या’ कारच्या किंमती, ग्राहकांचा खिस्सा होणार अजूनच रिकामा

टोयोटा फॉर्च्युनर डिझाइन आणि फीचर्स

टोयोटा कंपनीच्या प्रसिद्ध फॉर्च्युनर कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स समाविष्ट आहेत. या कारचे शक्तिशाली इंजिन आणि रंगीत पर्याय या कारला आणखी चांगले बनवतात. फॉर्च्युनर कारमध्ये ७ सीटर सुविधा आहे जी सात व्हेरियंटमध्ये आणि दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

टोयोटा फॉर्च्युनर 7-सीटर एसयूव्ही पहिल्यांदा 2009 मध्ये भारतात लाँच करण्यात आली होती. यानंतर, टोयोटाने फॉर्च्युनर जीआर स्पोर्ट व्हेरियंट जोडून आपल्या लाइनअपचा विस्तार करण्यास कंपनीने सुरुवात केली.

टोयोटा फॉर्च्युनरच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. याशिवाय, फॉर्च्युनरमध्ये 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, किक-टू-ओपन पॉवर्ड टेलगेट आणि अँबियंट लाइटिंग सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

प्रत्येक राज्यासाठी फॉर्च्युनरचा वेटिंग पिरियड वेगवेगळ्या डीलर्स आणि व्हेरियंटनुसार बदलू शकतो. त्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या टोयोटा डीलरशी संपर्क साधू शकता.

Web Title: Price of toyota fortuner is increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 07:30 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.