फोटो सौजन्य: Social media
भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्र हे खूप मोठे क्षेत्र आहे. ज्यामुळे या क्षेत्रात आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी अनेक ऑटो कंपन्या नवनवीन कार भारतीय बाजारात आणत असतात. देशात अनेक विदेशी ऑटो कंपन्या देखील कार्यरत आहेत. त्यातीलच एक महत्वाचे आणि अग्रगण्य नाव म्हणजे एमजी मोटर्स.
एमजी मोटर्स भारतात अनेक बेस्ट कार ऑफर केल्या आहेत. सध्या कंपनी इलेक्ट्रिक कारच्या उत्पदनावर विशेष लक्ष देत आहे. कंपनीची MG Windsor EV तर अनेक महिन्यांपासून ग्राहकांची लोकप्रिय ईव्ही बनली आहे. पण आता 2025 मध्ये कंपनीने आपल्या काही कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
वाह रे चायनीज टेक्नॉलॉजी ! आता रस्त्यावरचा खड्डा दिसला की BYD ची ‘ही’ कार मारेल चक्क उडी
जानेवारी २०२५ मध्ये, एमजी मोटरने त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. एमजीने ICE सोबत त्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने त्यांच्या वाहनांच्या किंमती 12 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये केल्या आहेत. कोणत्या कारच्या किंमती किती वाढल्या आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
एमजी मोटरने त्यांच्या इलेक्ट्रिक कार झेडएस ईव्हीच्या किंमती 1.20 लाख रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. त्याच्या बेस व्हेरियंटची किंमत वाढवण्यात आलेली नाही.
Excite Pro ची किंमत 49,800 रुपयांनी वाढली आहे.
Exclusive Plus व्हेरियंटची किंमत 92,000 रुपयांनी वाढली आहे.
Exclusive Plus Dual Tone ची किंमत 91,000 रुपयांनी वाढली आहे.
Essence व्हेरियंटची किंमत 1,21,000 रुपयांनी वाढली आहे.
Essence Dual Tone ची किंमत 1,20,000 रुपयांनी वाढली आहे.
एमजी मोटरने त्यांच्या एस्टरच्या किंमतीत 49 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्याच्या बेस व्हेरियंटमध्येही कोणतीही वाढ झालेली नाही.
1.5 लिटर सामान्य पेट्रोल-मॅन्युअल
Shine व्हेरियंटची किंमत 12,000 रुपयांनी वाढली आहे.
Select व्हेरियंटची किंमत 13,000 रुपयांनी वाढली आहे.
Select Black Storm ची किंमतही 13 हजार रुपयांनी वाढली आहे.
Sharp Pro ची किंमत 21,000 रुपयांनी वाढली आहे.
Sharp Pro 100Y ची किंमत 45,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
1.5L रेग्युलर पेट्रोल-ऑटोमॅटिक
Select व्हेरियंटची किंमत 14,000 रुपयांनी वाढली आहे.
Select Black Storm ची किंमतही 14,000 रुपयांनी वाढली आहे.
Sharp Pro ची किंमत 23,000 रुपयांनी वाढली आहे.
Sharp Pro 100Y ची किंमत 49,000 रुपयांनी वाढली आहे.
Savvy प्रो ची किंमत 24,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
एमजी मोटरच्या इलेक्ट्रिक कार कॉमेटच्या किंमती वाढल्या आहेत.
Excite ची किंमत 12,000 रुपयांनी वाढली आहे.
Excite FC ची किंमत 17,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
Exclusive ची किंमत 14,000 रुपयांनी वाढली आहे.
Exclusive FC ची किंमत 19,000 रुपयांनी वाढली आहे.
100YR Edition ची किंमतही 19,000 रुपयांनी वाढली आहे.