Kia Syros Vs Skoda Kylaq: कोणती कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर?
भारतीय बाजारात अनेक कार उत्पादक कंपन्यांनी ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार बेस्ट एसयूव्ही ऑफर केल्या आहेत. एसयूव्ही म्हंटलं की अनेक ग्राहक वेगवेगळ्या चॉईस असतात. सध्या भारतीय बाजारात दोन एसयूव्ही धुमाकूळ घालताना दिसत आहे. या एसयूव्ही म्हणजे किया सायरोस आणि स्कोडा कायलाक. पण जेव्हा या दोन्हींपैकी बेस्ट एसयूव्ही कोणती असा प्रश्न येतो तेव्हा अनेक जण गोंधळून जातात. चला या दोन्ही कॉम्पेक्ट एसयूव्हीबद्दल जाणून घेऊया.
Honda CBR650R आणि CB650R चा अफलातून टिझर जारी, लवकरच भारतात होणार लाँच
कंपनीने किआ सायरोसमध्ये दोन इंजिन पर्याय दिले आहेत. यात एक लिटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे जे 120 पीएस पॉवर आणि 172 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. याशिवाय, यात 1.5 लिटर डिझेल इंजिन देखील आहे, जे त्याला 116 पीएसची शक्ती आणि 250 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. दोन्हीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय आहेत.
स्कोडा क्यलॅकमध्ये एक लिटर क्षमतेचे टीएसआय इंजिन दिले आहे. ज्यामुळे त्याला 85 किलोवॅटची शक्ती आणि 178 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. यात 6 स्पीड मॅन्युअल आणि डीसीटी ट्रान्समिशनचा पर्याय आहे. सध्या या एसयूव्हीच्या मायलेजची माहिती उपलब्ध नाही.
Yamaha च्या ‘या’ बाईकला मिळणार हायब्रीड पॉवर, Bharat Mobility Global Expo मध्ये होणार लाँच
कियाने सायरोस एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिली आहेत. यात 30-इंचाचा ट्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनल आहे. ज्यामध्ये कनेक्टेड कार नेव्हिगेशन सिस्टम, ड्युअल पेन सनरूफ, 64 रंगांचे अँबियंट लाईट्स, रिअर सीट रिक्लाइन, स्लाइड आणि व्हेंटिलेटेड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
स्कोडा क्यलॅकमध्ये, कंपनीने चमकदार काळा फ्रंट ग्रिल, 17 इंच अलॉय व्हील्स, एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लाइट्स, ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हरसाठी ६ वे इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल सीट्स, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, सिंगल पॅन इलेक्ट्रिक सनरूफ, 20.32 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, 25.6 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, ट्रंकमध्ये तीन किलो क्षमतेचा हुक अशी अनेक फीचर्स देण्यात आली आहेत.
किआ सायरोसमध्ये लेव्हल-2 एडीएएससह 15 ऑटोनॉमस सेफ्टी फीचर्स आहेत. याशिवाय, OTA अपडेट, सहा एअरबॅग्ज, ABS, EBD, हिल असिस्ट, पार्किंग सेन्सर, पार्किंग कॅमेरा, ISOFIX चाइल्ड अँकरेज यांसारखी अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत.
दुसरीकडे, स्कोडा Kylaq मध्ये 25 हून अधिक अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स दिले गेले आहेत, ज्यात सहा एअरबॅग्ज, ब्रेक डिस्क वाइपिंग, ईएससी, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक आणि मल्टी-कोलिजन ब्रेक यांचा समावेश आहे.
कियाने अद्याप सायरोसची किंमत जाहीर केलेली नाही. कंपनी लवकरच या कारची किंमत जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. तरी सुद्धा त्याची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 9 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.
स्कोडा कायलक एसयूव्ही भारतात 7.89 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 14.40 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. यासाठी बुकिंग देखील 2 डिसेंबरपासून सुरू झाले आहे, परंतु डिलिव्हरी 27 जानेवारी 2025 पासून सुरू होईल.