फोटो सौजन्य: Social Media
युरोपची वाहन निर्माता कंपनी स्कोडाने नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात स्कोडा कायलॅक लाँच केली होती. तेव्हा या कारच्या विविध व्हेरियंटस आणि त्यांच्या किंमतीबद्दल कंपनीकडून कुठलाही खुलासा करण्यात आला नव्हता. परंतु आता कंपनीने या कारची बुकिंग सुरु करण्यासोबतच, ही एसयूव्ही कोणत्या व्हेरियंट आणि त्यानुसार कोणत्या किंमतीत असणार आहे, त्याबद्दल खुलासा केला आहे. चला आयाबद्दल अधिक जाणून घेऊया.
स्कोडा ऑटो इंडियाची सब-४ मीटर एसयूव्ही सेगमेंटमधील पहिली व्हेईकल कायलॅक आता व्हेरिएण्ट्स व किमतींच्या संपूर्ण श्रेणीसह लाँच करण्यात आली आहे. कायलॅक आता क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर+ आणि प्रेस्टिज या चार व्हेरियंट पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. या एसयूव्हीची सुरूवातीची किंमत कायलॅक क्लासिक ट्रिमसाठी ७.८९ लाख रूपये आहे. टॉप-ऑफ-द-लाइन कायलॅक प्रेस्टिज एटीची विक्री १४,४०,००० रूपयांमध्ये करण्यात येईल. या एसयूव्हीची बुकिंग सुरु झाली असून डिलिव्हरी 27 जानेवारी 2025 ला सुरु होईल.
Skoda Kylaq Variants | किंमत (Ex-Showroom) |
---|---|
Classic MT | Rs. 7.89 lakh |
Signature MT | Rs. 9.59 lakh |
Signature AT | Rs. 10.59 lakh |
Signature+ MT | Rs. 11.40 lakh |
Signature+ AT | Rs. 12.40 lakh |
Prestige MT | Rs. 13.35 lakh |
Prestige AT | Rs. 14.40 lakh |
ग्राहकनासाठी स्कोडाने एक विशेष लिमिटेड टाइम ऑफर सुद्धा आणलाय आहे. या एसयूव्हीच्या पहिल्या ३३,३३३ ग्राहकांना कॉम्प्लीमेण्टरी ३-वर्ष स्टॅण्डर्ड मेन्टेनन्स पॅकेज (एसएमपी) मिळणार आहे. चला आता या कारच्या फीचर्सबद्दल अजनून घेऊया.
या नवीन कारमध्ये चमकदार ब्लॅक फ्रंट ग्रिल, 17 इंच अलॉय व्हील, एलईडी हेडलाइट्स, LED DRL, LED टेल लाइट्स, ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हरसाठी 6-वे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल सीट्स, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, सिंगल पेन इलेक्ट्रिक सनरूफ, 20.32 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, 25.6 सेमी इंफोटेनमेंट सिस्टम, ट्रंकमध्ये तीन किलोग्रॅम क्षमतेचे हुक यांसारखी अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
Skoda Kylaq SUV मध्ये सेफ्टीकडेही खूप लक्ष दिले गेले आहे. SUV मध्ये 25 हून अधिक सक्रिय आणि निष्क्रिय सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यात सहा एअरबॅग्ज, ब्रेक डिस्क वाइपिंग, ESC, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक, मल्टी कोलिजन ब्रेक या फीचर्सचा समावेश आहे.
Skoda ने कायलॅक SUV मध्ये एक लिटर क्षमतेचे TSI इंजिन दिले आहे. ज्यामुळे याला 85 किलोवॅटचा पॉवर आणि 178 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. यात 6 स्पीड मॅन्युअल आणि डीसीटी ट्रान्समिशनचा पर्याय आहे.
Skoda Kylaq कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये आणण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी ब्रीझा, Kia Sonet, Hyundai Venue, Tata Nexon भारतात आधीच ऑफर केले गेले आहेत. या SUV सोबत, त्याची थेट स्पर्धा रेनॉ किगर आणि निसान मॅग्नाइट यांच्याशीही असेल.