Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fortuner–Gloster चे धाबे दणाणणार! Volkswagen आणणार ‘ही’ खास नवीन 7-सीटर SUV

भारतात एसयूव्ही सेगमेंटमध्ये फॉर्च्युनर आपले वर्चस्व गाजवत असतानाच आता Volkswagen त्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी Tayron R-Line ही 7 सीटर नवीन एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 09, 2026 | 05:18 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • फोक्सवॅगन त्यांची नवीन एसयूव्ही आणायच्या तयारीत
  • थेट Fortuner–Gloster सोबत असेल स्पर्धा
  • जाणून घ्या अपेक्षित किंमत
भारतीय ऑटो मार्केटमध्ये SUVs च्या मागणीत चांगलीच वाढ होताना दिसत आहे. ग्राहक इतर वाहनांच्या तुलनेत एसयूव्ही सेगमेंटमधील वाहनांना जास्त मागणी देत आहे. गेली अनेक वर्ष, एसयूव्ही सेगमेंटमध्ये टोयोटा फॉर्च्युनर एकतर्फी आपले वर्चस्व गाजवत आहेत. मात्र, आता टोयोटाला टक्कर देण्यासाठी Volkswagen त्यांची नवीन 7 सीटर एसयूव्ही मार्केटमध्ये आणत आहे.

फोक्सवॅगन भारतात त्यांची नवीन प्रीमियम 7-सीटर एसयूव्ही, SUV Tayron R-Line लाँच करण्याची तयारी करत आहे. ही एसयूव्ही 2026 च्या पहिल्या तिमाहीत भारतीय बाजारात लाँच केली जाईल. लाँच झाल्यानंतर, टायरॉन आर-लाइन भारतात फोक्सवॅगनची प्रमुख एसयूव्ही बनेल. कंपनी ही कार अशा ग्राहकांसाठी सादर करत आहे जे Toyota Fortuner आणि MG Gloster सारख्या मोठ्या, अधिक आलिशान आणि अधिक शक्तिशाली 7-सीटर एसयूव्हीच्या शोधात आहेत.

Autocar Awards 2026 मध्ये ‘या’ कंपन्यांचा डंका! ‘ही’ SUV ठरली कार ऑफ दि इयर

प्रीमियम सेगमेंटवर Volkswagen चे लक्ष

Tayron ची एंट्री हे स्पष्ट करते की कंपनी भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखत आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन Volkswagen ही SUV लोकली असेंबल करण्याच्या तयारीत असून, त्यामुळे किंमत अधिक स्पर्धात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. Tayron R-Line मध्ये कुटुंबासाठी भरपूर स्पेस आणि उत्तम कम्फर्ट मिळेल, तसेच R-Line पॅकेजमुळे या SUV ला स्पोर्टी टचही लाभेल.

दमदार आणि स्पोर्टी डिझाइन

Volkswagen Tayron R-Line चा लुक मजबूत आणि प्रीमियम असेल. फ्रंटला संपूर्ण रुंदीभर पसरलेली LED लाईट स्ट्रिप देण्यात आली असून, ती दोन्ही हेडलॅम्प्सना जोडते. याच्या मध्यभागी लाईटेड VW लोगो असून, त्यामुळे SUV ला वेगळी ओळख मिळते. मागील बाजूस कनेक्टेड LED टेललॅम्प्स आणि लाईटेड VW लोगो देण्यात आला आहे. ग्लोबल मॉडेलमध्ये 17-इंच अलॉय व्हील्स मिळतात; मात्र भारतात येणाऱ्या व्हर्जनमध्ये 19-इंच मोठे अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता असून, यामुळे रोड प्रेझेन्स अधिकच दमदार दिसेल.

Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा

इंजिन आणि संभाव्य किंमत

भारतात Volkswagen Tayron R-Line ला 2.0-लीटर TSI पेट्रोल इंजिनसह सादर केले जाऊ शकते. हे इंजिन दमदार परफॉर्मन्स आणि स्मूथ ड्रायव्हिंगसाठी ओळखले जाते. किमतीबाबत बोलायचे झाल्यास, याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 49 ते 50 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही SUV थेट Toyota Fortuner आणि MG Gloster ला टक्कर देईल.

 

Web Title: Volkswagen 7 seater suv tayron r line to compete with fortuner gloster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • automobile
  • Marathi News
  • new car
  • SUV

संबंधित बातम्या

Autocar Awards 2026 मध्ये ‘या’ कंपन्यांचा डंका! ‘ही’ SUV ठरली कार ऑफ दि इयर
1

Autocar Awards 2026 मध्ये ‘या’ कंपन्यांचा डंका! ‘ही’ SUV ठरली कार ऑफ दि इयर

Bhandara News: २२६२१ कामगारांना २२.७४ कोटींची मदत; कल्याणकारी योजनांमुळे श्रमिकांना मोठा दिलासा
2

Bhandara News: २२६२१ कामगारांना २२.७४ कोटींची मदत; कल्याणकारी योजनांमुळे श्रमिकांना मोठा दिलासा

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
3

‘जुनी गाणी, नवे सूर…’ ‘अगं अगं सूनबाई!’चा खास संगीतप्रयोग, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Ahilyangar News: शेतकरी पुन्हा अडचणीत! रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ
4

Ahilyangar News: शेतकरी पुन्हा अडचणीत! रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.