फोटो सौजन्य: iStock
आजही रस्त्यावर जर आपल्याला एखादी बुलेट जाताना दिसली की आपली नजर आपसूकच तिच्यावर रोखली जाते. भारतीय लोकांमध्ये विशेषकरून तरुणाईमध्ये रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सची जोरदार क्रेझ पाहायला मिळते. त्यामुळेच अनेक तरुण जेव्हा कामाला लागतात तेव्हा आपली पहिली बाईक बुलेटच असावी असे त्यांचे स्वप्न असते. आज कित्येकांची बुलेट ही एक ड्रीम बाईक बनली आहे. आजही बुलेटवर बसल्यावर कित्येक तरुणांना एक वेगळाच फील येत असतो. कित्येक तरुणांना बुलेट चालवण्यात एक वेगळाच रुबाब वाटत असतो.
हे देखील वाचा: September 2024 ठरला Hero Motocorp साठी फायदेशीर, विकल्या तब्बल ‘इतके’ युनिट्स
भारतातील क्रेझ पाहता रॉयल एन्फिल्ड कंपनी सुद्धा अनेक बाईक्स लाँच करत असते. Royal Enfield, लेट, क्लासिक, हंटर आणि इंटरसेप्टर सारख्या बाईक लाँच करणाऱ्या या कंपनीने सप्टेंबर 2024 मध्येही चांगली विक्री केली आहे. गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारात किती युनिट्सची विक्री झाली. किती युनिट्सची निर्यात झाली? कंपनीची वार्षिक कामगिरी कशी आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया.
Royal Enfield ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2024 मध्ये एकूण 86978 युनिट्स विकल्या गेल्या आहेत. तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 78580 मोटारींची विक्री केली होती. रॉयल एनफिल्डने वार्षिक आधारावर 11 टक्के वाढ साधली आहे.
हे देखील वाचा: 3 ऑक्टोबरला Kia कडून ‘या’ 2 नवीन कार मार्केटमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारात 79326 युनिट्सची विक्री झाली होती. तर सप्टेंबर 2023 मध्ये ही संख्या 74261 युनिट होती. म्हणजेच कंपनीच्या विक्रीत सात टक्क्याने वाढ झाली आहे. तर गेल्या महिन्यात 7652 युनिट्सची निर्यात झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये 4319 युनिट्सची निर्यात झाली होती. कंपनीच्या निर्यातीत 77 टक्के वाढ झाली आहे.
रॉयल एनफिल्डने अनेक उत्तम बाईक्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. कंपनी 350 सीसी ते 650 सीसी पर्यंतच्या बाईक्स ऑफर करते. यामध्ये Royal Enfield Hunter 350, Bullet 350, Classic 350, Meteor 350, Scram 411, Himalyan 450, Guerrilla 450, Shotgun 650, Interceptor 650, Continental GT 650 सारख्या बाईक्सचा समावेश आहे.